अमरावती : आरटीई नियमांतर्गत २५ टक्केआरक्षित जागांवरील प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी शिक्षण विभागाने आॅनलाईन पद्धत सुरू केली आहे. त्यांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले. परंतु दिलेल्या संकेतस्थळावर कायम अडचणी येत असून वारंवार संकेतस्थल ‘हँग’ होत असल्याने आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरु होण्यापूर्वीच कोलमडल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने आॅनलाईन सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी शाळांकडून केली जात आहे. अल्पसंख्यकांच्या शाळा वगळता सर्व विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित खासगी शाळेच्या २०१५-१६ सत्रासाठी आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांचे प्रवेश ६६६.१३ी25ंे्रि२२्र.ेंँं१ं२ँ३१.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावरून सुरू आहेत. शिक्षण विभागाच्यावतीने तशा सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेची अंमलबजावणी करणे सक्तीचे आहे. प्रवेश प्रक्रियेविषयी असलेल्या शंका दूर व्हाव्यात यासाठी प्रक्रियेच्या नियमांची माहिती सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनाही देण्यात आली आहेत. १९० इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळा आरटीई प्रवेशासाठी पात्र आहेत. परंतु संकेस्थळामध्ये अनेक अडचणी येत असल्याने शाळांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेला घरघर
By admin | Updated: March 6, 2015 00:43 IST