शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

मुलींच्या खोलीत सचिवपुत्राचा बेधडक प्रवेश

By admin | Updated: December 25, 2014 23:23 IST

तपोवनातील बालगृहात वास्तव्यास असलेल्या मुलींच्या कक्षात सचिव श्रीराम गोसावी यांचा पुत्र बेधडक प्रवेश करायचा. मुलींच्या गळ्यात हात घालायचा. या गंभीर प्रकाराची तक्रार बालगृहातीलच मुलींनी सचिव

गोसावींची दुसरी पिढीही : वडील म्हणाले, 'त्याची तक्रार अधीक्षकांकडे करा, मी सचिव!'गणेश देशमुख - अमरावतीतपोवनातील बालगृहात वास्तव्यास असलेल्या मुलींच्या कक्षात सचिव श्रीराम गोसावी यांचा पुत्र बेधडक प्रवेश करायचा. मुलींच्या गळ्यात हात घालायचा. या गंभीर प्रकाराची तक्रार बालगृहातीलच मुलींनी सचिव श्रीराम गोसावी यांच्याकडे केली होती; तथापि अधीक्षकांकडे तक्रार करा. मी सचिव आहे, असा अफलातून सल्ला त्यांनी मुलींना दिला होता. त्याग अन् सेवाभावाची भूमी असलेल्या तपोवनात कार्यरत असणाऱ्यांची मानसिकता बघा! पुत्राच्या अश्लील वागणुकीची तक्रार केल्यानंतरही सचिवांनी त्या तक्रारीची दखल घेतली नाही. ज्या अधीक्षकांकडे तक्रार करण्यास मुलींना गोसावींनी सांगितले ते गजानन चुटे असल्या अनैतिक आणि नियमबाह्य बाबींना बळ देणारेच होते. मुलींच्या तक्रारी दडपण्यासाठीच ते सर्व मुलींमध्ये ओळखले जायचे. चुटेला याच कारणासाठी पोलिसांनी अटकही केली. गोसावीच्या मुलाचा असा प्रकार ज्या मुलींना खपत नव्हता त्यापैकी मोजक्या मुलींनी प्रशासक असलेल्या अजय लहाने यांच्याकडे तक्रार केली होती. इतक्या गंभीर प्रकरणाची तक्रार झाल्यावर लहाने यांनी खडबडून जागे व्हायला हवे होते. तातडीने या प्रकाराची स्वत:च्या पातळीवर चौकशी करायला हवी होती. इतकेच नव्हे, तर गोपनीय पद्धतीने माहिती घ्यायला हवी होती. परगावी राहणाऱ्या गोसावीच्या मुलाचा बालगृहाशी काय संबंध? तो बालगृहात येतो कसा? त्याचे मित्र बालगृहात कुण्या अधिकाराने शिरतात? तो मुलींच्या खोलीत प्रवेश करतोच कसा? या मुद्यांची त्यांनी गांभीर्याने दखल घ्यायला हवी होती. अधीक्षक गजानन चुटे, श्रीराम गोसावी आणि त्यांच्या मुलाविरुद्ध लहाने यांनी पोलीस तक्रार नोंदवायला हवी होती. प्रशासकाचे हेच कर्तव्य ठरते. 'केअर अ‍ॅन्ड प्रोटेक्शन अ‍ॅक्ट'अंतर्गत बालगृहातील मुली सुरक्षित रहाव्यात यासाठीच लहाने यांनी नियुक्ती करण्यात आली आहे; तथापि वर्षभरापूर्वीच्या या प्रकारानंतरही लहाने यांनी मुलींच्या सुरक्षिततेसाठी कुठलेही पाऊल उचलले नाही.