शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यात महामार्गावर 'रॉबरी' करणारे दोघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 20:23 IST

महामार्गावर वाटमारी करणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी गजाआड केले. अटक आरोपी मध्यप्रदेशातील आहेत.

ठळक मुद्दे गुन्ह्यात वापरलेली चारचाकी अपघातग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महामार्गावर वाटमारी करणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी गजाआड केले. अटक आरोपी मध्यप्रदेशातील आहेत.२४ फेब्रुवारी रोजी पहाटे ३.३० च्या दरम्यान लोणी महामार्गावर जीजे ०५ बीएक्स ८४२९ क्रमांकाचा ट्रक उभा असताना अज्ञात चार इसमांनी चारचाकी वाहनातून येऊन ट्रक चालकास चाकुचा धाक दाखविला. ट्रक चालकाजवळील १७ हजार रुपय रोख व ३ हजार रुपयांचा मोाबईल असा २० हजार रुपयांचा ऐवज जबरीने घेऊन पसार झाले. याप्रकरणी लोणी पोलिसांत भादंविच्या कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल होता. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यातील मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज व टोल नाक्यावरील फुटेजची पाहणी केली. गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन हे सुनील रामचंद्र फुलेरीया (३४, रा. दुपाडा, जि. शाजापूर, मध्यप्रदेश) यांच्या नावाचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक मध्यप्रदेशात रवाना करण्यात आले. पथकाने खंडवा, इंदौर, भोपाळ, शाजापूर, देवास येथे विविध ठिकाणी ३ ते ४ दिवस तळ ठोकला. सदर वाहनाचा मालक सुनील रामचंद्र फुलेरीया हा मध्यप्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील दुपाडा येथे असल्याबाबतची माहिती मिळाली. दुपाडा हे चारचाकी वाहनातील डिझेल तसेच इतर मौलवान वस्तू चोरी करणाºया गुन्हेगारांचे गाव असल्याबाबत माहिती मिळाली. सदर पथकाने सुनील फुलोरीया याला ताब्यात घेतले. सदर आरोपीस गुन्ह्याबाबत विचारणा केली असता, त्याने प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिली. परंतु, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सदर गुन्ह्यात श्रावण हरनाथसिंग चौहान (२०, रा. विकासनगर, देवास, मध्यप्रदेश), धर्मेंद्र शिवनारायण सोलंकी (२५, रा. दुपाडा), कमल हे सहभागी असल्याबाबत सांगितले.गुन्ह्यात वापरण्यात आलेले एमपी ०९ सीजे ८१८८ हे वाहन अपघातग्रस्त असल्याने ते पोलीस ठाणे पार्वती आष्टा जि.सिहौर, मध्यप्रदेश येथे जमा आहे. त्यानंतर गुन्ह्यातील दुसरा आरोपी श्रावण हरनाथसिंग चौहाण (२०, रा. विकासनगर) याला देवास (मध्यप्रदेश) येथून ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यातील इतर दोन आरोपी पसार असून, त्यांचा शोध सुरू आहे. अटक आरोपींकडून ३० हजार ९५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., अपर पोलीस अधीक्षक शाम घुगे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी सूरज बोंडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, एएसआय संतोष मुंदाने, नापोकॉ चंद्रशेखर खंडारे, श्याम गावंडे, दिनेश कनोजीया, अमोल केंदे्र, आशिष भुंबरे चालक अब्दुल सईद यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी