शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
3
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
4
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
5
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
6
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदिपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
7
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
8
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
9
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
10
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
11
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
12
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
13
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
14
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
15
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
16
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
17
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
18
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
19
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
20
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."

‘महानेट’ प्रकल्पाच्या नावाने फोडले शहरातील रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 06:00 IST

शासनाने शहरी महानेट प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील महत्त्वाचे शासकीय विभाग व त्याच्या अधिनस्त असलेल्या एकूण ४६१ कार्यालयांना फायबर आॅप्टिकल कनेक्टिव्हिटीद्वारे जोडण्यात येणार आहे. ही इंटरनेट सुविधा रिलायन्स कंपनीमार्फत पुरविली जाणार आहे. याची जोडणी व वापराचे शुल्क शासनाद्वारा दिल्या जाणार आहे.

ठळक मुद्देमहापालिका प्रशासन झोपेत : जिल्हा प्रशासनाची कंत्राटदाराला मोकळीक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील शासकीय विभाग व त्याचे अधिनस्त असणारी ४६१ शासकीय कार्यालये फायबर आॅप्टिकल केबलने जोडण्यात येणार आहे. या शहरी महानेट प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण मोकळीक या कंत्राटदाराला दिली असल्याने महानेटच्या नावाखाली शहरातील रस्ते रिलायन्स (जिओ) द्वारा फोडण्यात येत आहेत. याकडे जिल्हा व महापालिका प्रशासन डोळेझाक करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.शासनाने शहरी महानेट प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील महत्त्वाचे शासकीय विभाग व त्याच्या अधिनस्त असलेल्या एकूण ४६१ कार्यालयांना फायबर आॅप्टिकल कनेक्टिव्हिटीद्वारे जोडण्यात येणार आहे. ही इंटरनेट सुविधा रिलायन्स कंपनीमार्फत पुरविली जाणार आहे. याची जोडणी व वापराचे शुल्क शासनाद्वारा दिल्या जाणार आहे.राज्य शासनाला हा प्रकल्प वेळेत पूर्ण करायचा असून, शासनाने जिल्हा पातळीवरील विभागप्रमुखांना जोडणीसाठी निर्माण होणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सुचित केले आहे. यासाठी शासनाने सर्व प्रकारच्या परवानग्या आणि शुल्कात सूट दिलेली असल्याचे नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांनी शहरातील ३४ शासकीय कार्यालयांना कळविले आहे.रिलायन्सला सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी खुद्द जिल्हा प्रशासनच रेड कार्पेट टाकत असल्याने कंत्राटदाराला रान मोकळे झाले आहे. या जोडणीसाठी केबल टाकण्याच्या नावाखाली शहरातील अनेक रस्ते फोडण्यात येत आहेत. विशेष म्हणजे या सर्व ठिकाणी कुठलीही शासकीय कार्यालये नसल्याने रिलायन्सला जिल्हा व महापालिका प्रशासनाची एवढी सवलत का, असा नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.रिलायन्सला रेड कार्पेट, महापालिका प्रशासन गपगाररिलायन्स कंपनीसाठी शहरातील रस्ते फोडले जात आहेत. याचसोबत काही ठिकाणी नागरिकांच्या नळजोडण्यादेखील तोडण्यात आल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांना पाणी मिळत नाही. रस्त्यांची दुरुस्ती होण्याऐवजी चांगले रस्ते फोडून अडचणीत भर पडत असताना महापालिका प्रशासन गपगार आहे. काही अधिकारी तर आम्हाला यातले काही माहिती नाही अशी भूमिका घेत आहेत. विशेष म्हणजे काही ठिकाणी कुठलेच शासकीय कार्यालय नसताना केवळ रिलायन्सची केबल टाकण्यासाठी रस्ते फोडले जात असल्याचा नगरसेवकांचा आरोप आहे.शासकीय कामाच्या नावाखाली शहरातील रस्ते फोडण्याचा गोरखधंदा रिलायन्सने सुरू केला आहे. शासकीय कार्यालये नसलेल्या ठिकाणीदेखील केबल टाकण्यासाठी नागरिकांना वेठीस धरले जात आहे.- प्रशांत डोंगरे, नगरसेवकशासकीय विभाग व अधिनस्त कार्यालयांना फायबर आॅप्टकिल केबलने जोडण्यात येत आहे. यासाठीचा हा महानेट प्रकल्प आहे. फोडण्यात आलेले रस्ते कंत्राटदाराकडून पूर्ववत करण्यात येणार आहे.- नितीन व्यवहारे, नोडल,अधिकारी तथा आरडीसी 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकWaterपाणी