दर्यापूर : केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल व गॅस दरवाढीविरोधात व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी शिवसेनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शिवसेना तालुकाप्रमुख गोपाल अरबट, उपजिल्हाप्रमुख गजानन वाकोडे, शहरप्रमुख रवींद्र गणोरकर यांच्या उपस्थितीत गांधी चौकात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
रमेश जोध, बबनराव विल्हेकर, विजय तळोकार, योगेश बुंदे, नीलेश पारडे, विनोद तराळ, शरद अरबट, सौरभ वायझाडे, पवन घुनारे, नीलेश मोहोड, गजानन खेडकर, गोपाल काठोडे, तुषार चौधरी, अभिजित प्रांजळे, राहुल भुबर, नागोराव केने, गौरव सगणे, प्रशांत धर्माळे, गणेश गावंडे, विजय खंडारे, संजय राणे, खंडू पाटील, प्रतीक लाजूरकर, सचिन कोरडे, मनोज बगाडे, अक्षय गावंडे, शिवा राऊत, कमलेश वानखडे, गजानन चांदूरकर, श्याम अरबट, शिवशंकर अरबट, सुमीत गोरले, राजेश मानकर, सुनील बिजवे, भगवान उताळे, सतीश देशमुख, दिलीप कपिले आदी उपस्थित होते.
--------------------------