शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

मूलभूत सुविधा नसल्याने रस्त्यावर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:13 IST

श्यामकांत पाण्डेय फोटो पी १२ धारणी फो्डर पान २ ची बॉटम धारणी : शहराला लागून असलेल्या सर्वे नंबर १३२ ...

श्यामकांत पाण्डेय

फोटो पी १२ धारणी फो्डर

पान २ ची बॉटम

धारणी : शहराला लागून असलेल्या सर्वे नंबर १३२ म्हणजेच तलाई कॅम्प हे मौजा दिया अंतर्गत येणाऱ्या तलाई गावाचा ले-आऊट झालेला भाग. परंतु, या भागात मूलभूत सुविधा जसे रस्ते, नाली, पाणीपुरवठा पाईपलाईन नसल्यामुळे सुशिक्षितांच्या या क्षेत्रात सर्वच वंचितसारखे राहत आहेत.

सर्व्हे नंबर १३२ ला लागून उत्तरेकडे हरिहरनगर हे खासगी ले-आऊट असून, तेथे ग्रामपंचायत दियामार्फत कोट्यवधी रुपयांची अवैधरीत्या विकासकामे करण्यात आली आहेत. हरिहरनगरमध्ये खासगी अभिन्यासधारकाने रस्ते व नालीचे बांधकाम करणे आवश्यक होत. मात्र, तलाई कॅम्प भागातील शासकीय लेआउटमधील विकासनिधी वेळोवेळी हरिहरनगरमध्ये पळविण्यात आला. याची चौकशी होणे गरजेचे आहे. येथील प्राध्यापक कॉलनी थोडीफार विकसित झाली आहे. एक-दोन रस्ते या भागात दिसून येतात. मात्र, उर्वरित सर्वे नंबर विकासापासून पूर्णपणे वंचित आहे. या भागात अनेक गर्भश्रीमंतांनी बांधकाम करताना स्वत:ची जागा पूर्णपणे बांधून आजूबाजूतील रस्ते व गल्लीतसुद्धा अतिक्रमण करून रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे अनेकांना ये -जा करण्यासाठी रस्ता नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

बॉक्स

परस्पर विक्रीचा आरोप

सर्वे नंबर १३२ ला लागून उत्तरेकडे वासुदेव खार्वे यांचे शेत होते. कालांतराने ती शेती अशोक खारवे यांच्या नावे करण्यात आली. अशोक खार्वे यांनी धारणी तालुक्यातील सर्वात पहिली अकृषक आणि खासगी ले-आउट निर्मित केले. असे करताना पूर्ण भूखंड विक्री केले. त्यानंतर उत्तरेकडील काही शासकीय भूखंड अवैधरीत्या विक्री केल्याचा आरोप परिसरातील नागरिक करीत आहेत. याचीसुद्धा चौकशी होणे आवश्यक आहे.

कोट

सर्वे नंबर १३२ मध्ये अनेक गैरप्रकार घडले आहेत. या सर्व गैरप्रकारांची लवकरच चौकशी करण्यात येऊन प्रसंगी फौजदारी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया लवकरच राबविण्यात येईल.

- दुर्गा बिसंदरे,

सदस्य, ग्रामपंचायत, दिया