शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

४५ कोटींच्या रस्ते विकासाचा तिढा सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 23:05 IST

जिल्हा परिषद सत्ताधारी पक्षाने सन २०१८-१९ मध्ये बांधकाम विभागाकडील ग्रामीण रस्ते आणि इतर जिल्हा मार्गाच्या कामासाठी सुमारे ४५ कोटी रुपयांचे नियोजन केले होते. सदर नियोजनात प्रस्तावित केलेल्या कामांना जिल्हा नियोजन समितीची मान्यता घेण्यात न आल्याने या मुद्यावर सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप नोंदविला होता.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : विकासकामे मार्गी लागणार; ५२ किलोमीटरचे डांबरीकरण, आठ पूल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद सत्ताधारी पक्षाने सन २०१८-१९ मध्ये बांधकाम विभागाकडील ग्रामीण रस्ते आणि इतर जिल्हा मार्गाच्या कामासाठी सुमारे ४५ कोटी रुपयांचे नियोजन केले होते. सदर नियोजनात प्रस्तावित केलेल्या कामांना जिल्हा नियोजन समितीची मान्यता घेण्यात न आल्याने या मुद्यावर सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप नोंदविला होता. त्यामुळे या विषय प्रलंबित होता. अशातच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत ४५ कोटींच्या नियोजनास मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता या कामाचा मार्ग सुकर झाला आहे.जिल्हा परिषदेतील सत्ताधारी पक्षाने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात ग्रामीण रस्ते आणि इतर जिल्हा मार्गांच्या कामासाठी सुमारे ४५ कोटी रुपयांतून मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत जिल्हा नियोजन समितीकडून विकासकामांसाठी लेखाशीर्ष ५०-५४ इतर जिल्हा मार्ग अंतर्गत १३ किलोमीटरचे नवे रस्ते आणि ५२ किलोमीटरचे डांबरीकरण तसेच आठ लहान पुलांच्या कामांचे नियोजन केले होते. याशिवाय ३०-५३ या लेखाशीर्षातंर्गत ग्रामीण रस्ते कार्यक्रमांचे नियोजन करून आमसभेचीही मंजूर दिली होती. जवळपास ४५ कोटी रूपयाच्या कामांचे नियोजना जिल्हा नियोजन समितीची मान्यता नसल्याचा आक्षेप विरोधी पक्षाचे सदस्यांनी घेतला होता.जवळपास ४५ कोटी रुपयाच्या ग्रामीण भागातील ३०-५४ आणि ५०-५४ या लेखाशीर्षातील रस्ते विकासाच्या कामांना जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली. ही कामे मार्गी लावण्यात आली. याबाबत प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे.- नितीन गोंडाणेअध्यक्ष, जि.प.जिल्हा नियोजन समितीने ग्रामीण रस्ते आणि इतर जिल्हा मार्गाच्या कामांना मान्यता दिली आहे. त्यानुसार मुख्यकार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात बांधकाम विभागाकडून ही कामे मार्गी लावले जातील.- प्रशांत गावंडे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग