शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

४० गावांचा रस्ता जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 5:00 AM

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची सीमा वाढल्याने स्थानिक नागरिकांसह गावांना जोडणाऱ्या मुख्य मार्गांनासुद्धा त्याचा फटका बसला आहे. दोन वर्षांपासून जंगलातून जाणाऱ्या तालुका मुख्यालयासह गावखेड्यांना जोडणारे सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यांच्या नूतनीकरण वजा रस्ता चौपदरीकरणाच्या कामाला वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या जाचक अटीपुढे परवानगी मिळालेली नाही.

ठळक मुद्देप्रशासन नियमात गुरफटले : दरड कोसळू लागल्या, मोठ्या अपघाताची भीती

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या जाचक नियमांपुढे सार्वजनिक बांधकाम विभागाने नांग्या टाकल्या आहेत. मात्र, पहाडावरून कोसळणाऱ्या दरडी मोठ्या अपघाताला आमंत्रण देत आहेत. तालुक्यातील घटांग ते काटकुंभपर्यंतचा रस्ता परिसरातील ४० गावखेड्यांतून ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी जीवघेणा ठरला आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची सीमा वाढल्याने स्थानिक नागरिकांसह गावांना जोडणाऱ्या मुख्य मार्गांनासुद्धा त्याचा फटका बसला आहे. दोन वर्षांपासून जंगलातून जाणाऱ्या तालुका मुख्यालयासह गावखेड्यांना जोडणारे सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यांच्या नूतनीकरण वजा रस्ता चौपदरीकरणाच्या कामाला वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या जाचक अटीपुढे परवानगी मिळालेली नाही. संरक्षित आणि अतिसंरक्षित परिक्षेत्र घोषित केल्याने दगडाला हात लावण्याचीही परवानगी नाही. तोसुद्धा एक मोठा गंभीर गुन्हा आहे. परिणामी परतवाडा, घटांग ते काटकुंभपर्यंत महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमारेषेपर्यंत जात असलेला हा रस्ता परिसरातील नागरिकांच्या जिवावर उठला आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही प्रशासन पूर्णत: दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. दरड कोसळून ढिगाºयाखाली दबून जीवितहानी झाल्यास संबंधित विभागाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पीयूष मालवीय व सहकाऱ्यांनी केली आहे.बांधकाम विभागाचे बांधले हातघटांग ते जारिदापर्यंत मध्य प्रदेशचा भाग वगळता रस्ता देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. मात्र, कोसळलेली दरड, दगड उचलल्यास व्याघ्र आणि वनविभागातर्फे कारवाईच्या नोटीसचे पत्र पाठविले जात आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने व्याघ्र प्रकल्पाच्या डोंगरातून कोसळणाऱ्या दरडी उचलणे बंद केले आहे.घरी परतण्याची हमी नाहीकाटकुंभ, चुरणी, जारिदा ते अतिदुर्गम हतरू परिसरातील ४० पेक्षा अधिक आदिवासी पाड्यांतील शेकडो नागरिकांसाठी काटकुंभ ते घटांग मार्ग सोईचा आहे. चिखलदरा, धारणी आणि परतवाडा येथे जाण्यासाठी जवळचा असलेल्या घटांगपासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत असलेल्या घाटवळणातून उंच पहाडावरून मोठ्या प्रमाणात दरड, दगड, माती, झाडे कोसळत आहे. त्या ढिगाऱ्याखाली कधी अपघात होईल, याची शाश्वती नाही. परिणामी घरी परत जाण्याची हमी उरलेली नाही.वाहतूक सुरळीत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग दरडी उचलायचा. वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या नियमांचा बडगा आल्याने त्यांनीच रस्त्यावरील गौण खनिज, माती, झाडे उचलण्याबाबत पत्र पाठविले आहे.- मिलिंद पाटणकर,उपविभागीय अभियंताघटांग ते मध्यप्रदेशच्या कुकुरूपर्यंत रस्त्यावर कोसळलेले दगड उचलण्यासह काही कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या दरडींची पाहणी करून अपघात होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.- निशा मोकाशेवनपरिक्षेत्र अधिकारी, घटांग

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा