शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्र झाले डंपिंग यार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 23:11 IST

शहरातून गोळा करण्यात आलेला कचरा बिच्छन नदीपात्रात टाकण्यासह रस्त्यावरच मृत जनावरांना टाकला जात असल्याचा ....

ठळक मुद्देनगरपालिकेचे दुर्लक्ष : आरोग्याशी खेळ, सर्वत्र दुर्गंधी, मृत जनावरांचा ढीग

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहरातून गोळा करण्यात आलेला कचरा बिच्छन नदीपात्रात टाकण्यासह रस्त्यावरच मृत जनावरांना टाकला जात असल्याचा संतापजनक प्रकार एलआयसी चौक ते कोर्ट रस्त्यावर दररोज झाला आहे. नगरपालिकेने चक्क नदीपात्रालाच डंपिंग यार्ड केल्याने येथे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.स्वच्छ भारत मिशनअंतर्गत देशभर स्वच्छतेचा संदेश दिला जात असताना परतवाडा-अचलपूर जुळ्या शहरात ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे आरोग्याशी खेळणारे ठरत आहे, तर परतवाडा शहरातील कचरा संकलन करून थेट बिच्छन नदीपात्रात टाकला जात आहे. रस्त्यावर राजा शिवाजी विद्यालय, उपविभागीय कार्यालय, एसडीपीओकाची जिल्हा न्यायालय, नझूल कार्यालय, कल्याण मंडपम, विद्यानिकेतन कॉलनी, आझादनगर परिसर आहे.सहा ट्रॅक्टर, आठ आॅटोपरतवाडा व अचलपूर शहरातील कचरा उचलण्यासाठी कंत्राट दिला त्यापैकी परतवाड्यातील कचरा उचलण्यासाठी ६ ट्रॅक्टर व आठ आॅटोतून कचरा संकलनाचे काम करण्यात येते. कल्याण मंडपमनजीकच्या बिच्छन नदीपात्रात अवैधरीत्या कंत्राटदाराने डंपिंग ग्राऊंड तयार केल्याचा प्रकार पुढे आला आहे.रस्त्यावरच मृत जनावरेअचलपूर नगर परिषदेच्यावतीने परतवाडा शहरातून गोळा करण्यात येणारा कचरा मिनी टेम्पोतून बिच्छन नदीपात्रात टाकण्यात येत असताना शहरात मृत पडलेले वराह थेट रस्त्यावरच टाकण्यात येत असल्याचा प्रकार नेहमीचाच झाला आहे. मृत जनावरांच्या दुर्गंधीचा सामना रस्त्याने जाणाºया नागरिकांना करावा लागत आहे. तर मोकाट कुत्री मृत जनावरांवर ताव मारण्यासाठी थेट रस्त्यावरच आणून टाकीत असल्याचे संतापजनक दृश्य आहे.रायपुरा परिसरात डंपिंगबिच्छन नदीपात्रात टाकण्यात आलेला कचरा विनापरवानगीने टाकला असून अचलपूर शहरातील रायपुरा परिसरात नगर पालिकेच्यावतीने डंपिंग ग्राऊंड तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.राजा शिवाजी विद्यालयाच्या पुलानजीक गत आठवड्यापर्यंत घंटा गाड्यांतून जमा करण्यात आलेला कचरा टाकण्यात येत होता. मात्र आता त्यावर बंदी असून टाकणाºयाविरूद्ध कारवाही करण्यात येईल. अचलपूर शहरातील रायपुरा भागात डंपींग ग्राऊंड तयार करण्यात आले आहे.- मो. जहीर, आरोग्य निरीक्षक, अचलपूर न.प.