शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘मुंबई रिटर्न’ भिक्षुकांपासून कोरोना संक्रमणाचा धोका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 05:00 IST

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री शहरात चौकाचौकांत सिंग्नलवरील भिक्षुकांचे  ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवून त्यांना घरी पाठविले. तरीही गुरुवारी स्थानिक गर्ल्स हायस्कूल चौकात दुपारी १२ ते १ वाजताच्या सुमारास मुले, महिला व बालके  भीक मागताना दिसून आले.  काही मुले अपूर्ण कपड्यांत होती.  तोंडाला मास्क नाही. सिग्नलवर वाहन थांबताच वाहनचालकांना पैशाची मागणी ते करतात. खुल्या आकाशाखाली उघड्यावर जगणे हाच त्यांचा शिरस्ता आहे.

ठळक मुद्देप्रशासन अनभिज्ञ, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता ?

 गणेश वासनिक    लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना संक्रमितांची आणि मृत्यूची संख्या रोडावली असली तरी मुंबईहून परत पाठविलेल्या भिक्षुकांपासून शहरवासीयांना कोविड-१९चा धोका वाढला आहे. मुंबईहून आलेल्या या भिक्षुकांच्या माध्यमातून शहरात कोरानाची दुसरी लाटही पसरू शकते, याबाबत प्रशासन अनभिज्ञ आहे. मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे मुंबईत भीक मागून उपजिविका चालविणारे बहुतांश पारधी समाजातील महिला, पुरुष हे कुटुंबीयांसह अमरावतीत दाखल झाले आहेत. यात काही नजीकच्या गाव-खेड्यांतील व्यक्तींचासुद्धा समावेश आहे. चार ते पाच महिन्यांपासून मुंबईहून परतलेल्या भिक्षुकांनी अमरावतीत महत्त्वाच्या चाैकात ठिय्या मांडला आहे. यात राजकमल चौक, श्याम चौक, इर्विन चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, रेल्वे स्टेशन चौक, बसस्थानक परिसराचा समावेश आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री शहरात चौकाचौकांत सिंग्नलवरील भिक्षुकांचे  ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवून त्यांना घरी पाठविले. तरीही गुरुवारी स्थानिक गर्ल्स हायस्कूल चौकात दुपारी १२ ते १ वाजताच्या सुमारास मुले, महिला व बालके  भीक मागताना दिसून आले.  काही मुले अपूर्ण कपड्यांत होती.  तोंडाला मास्क नाही. सिग्नलवर वाहन थांबताच वाहनचालकांना पैशाची मागणी ते करतात. खुल्या आकाशाखाली उघड्यावर जगणे हाच त्यांचा शिरस्ता आहे. दुकाने, प्रतिष्ठानांमध्ये दररोज भीक मागणाऱ्यांची संख्या २२५ च्या घरात  आहे. मुंबइईहून शहरात दाखल झालेल्यांची संख्या २०० च्या घरात आहे. चार-साडेचारशे भिक्षुक सतत वाहनचालकांच्या संपकार्त येत असल्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

कोरोना म्हणजे काय?मुंबई बंद होणार म्हणून तेथून हाकलले. एप्रिलपासून मूळ गावी पाेहोचलो. गावात उपजीविकेचे साधन नाही. त्यामुळे भीक मागून चार महिन्यांपासून अमरावतीत जगत आहे. कोरोना, मास्क काय आहे, हे माहिती नसल्याचे एकाने सांगितले. 

रस्त्यावरील भिक्षुकांना मास्क देणार कोण?रस्त्यावरील भिक्षुकांना पोट भरण्याची चिंता आहे. मिळेल ते खाणे आणि उघड्यावर जगणे, अशी त्यांची जीवनशैली आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत आहे. त्यामुळे सामाजिक स्ंघटना अथवा कार्यकर्त्यांनी  रस्त्यावरील भिक्षुकांना मास्क देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

सिग्नलवर भिक्षुकांची गर्दी ही बाब अशोभनीय आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ठाणेनिहाय बाहेरगावच्या भिक्षुकांना त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्याचे नियोजन आखले आहे. बुधवारपासून कार्यवाही सुरू झाली आहे. दिवाळीपूर्वीच भिक्षुकांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या घराकडे पाठविले जाणार आहे.- अशोक लांडे,  वाहतूक पोलीस निरीक्षक, पूर्व विभाग.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या