न्यायालयाचा निकाल : अखेर जमीन शेतकऱ्याच्या ताब्यातून मिळविली परत प्रकाश बोबडे पूर्णानगरभातकुली तालुक्यातील मक्रंदाबाद मक्रमपूर (पूर्णानगर) येथील महारुद्र मारोती संस्थानची जमीन ४० ते ५० वर्षांपासून येथील एका शेतकऱ्याच्या ताब्यात होती. सदर जमिनीचा ताबा हा शेतकरी सोडण्यास तयार नव्हता. मात्र, ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन प्रकरण न्यायालयात दाखल केले. कित्येक वर्षांनंतर एकतर्फी निकाल लागल्याने जमीन संस्थानच्या ताब्यात देण्यात आली आहे.सदर जमिनीवर मार्की येथील मधुकर आकोलकर, पंचफुला आकोलकर, रेखा कळसकर यांचा ताबा होता. ते ४० ते ५० वर्षांपासून शेताची वाहीपेरी करीत होते. त्यामुळे सदर जमीन संस्थानला देण्यात यावी यासाठी कमिटीचे अध्यक्ष श्रीराम माधवसा बनारसे, नामदेव दामुजी पाठक, रामराव लक्ष्मण कोल्हे, मारोती शंकरसा दद्गाळ, पंकज शिरभाते यांनी न्यायालयात दाद मागितली होती. कित्येक वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल संस्थानच्या बाजूने लागला आहे. शासनातर्फे मंडल अधिकारी जे.बी. बिजवे यांनी ताबा पावती मा. उपविभागीय अधिकारी तिवसा-भातकुली यांचे आर.सी नं. आरटीएस ५९(२०) मक्रमपूर १/२०१३-१४ आदेश पारित ८ एप्रिल २०१४ आणि रिवाईन आॅर्डर १९ जून २०१५ नुसार महारुद्र मक्रंदाबादतर्फे कमिटीचे अध्यक्ष श्रीराम बनारसे यांना दिली. आदेशाप्रमाणे शेत. सर्व्हे नं. /गट न. ७२ सर्वे नं. १९/१ क्षेत्र १ हे. २१ आर पेरणी झालेल्या शेताचा ताबा पंचासमक्ष १९ जून रोजी आदेशानुसार व मंजूर क्षेत्रानुसार एकतर्फी देण्यात आले. यावेळी पंच म्हणून सुभाष आखरे, सुरेंद्र राऊत, रामकृष्ण गोरले, पंकज ठाकूर, रजू ठाकूर, पोलीस पाटील सुनंदा संजय ढोले, नानूबाई शिरभाते, राजेश महिंगे, डब्ल्यू.एन.ढाले आदी उपस्थित होते.
‘त्या’जमिनीवर महारूद्र संस्थानचाच हक्क
By admin | Updated: July 10, 2015 00:51 IST