शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिदिनी गनिमी कावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 22:39 IST

मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी होणारा ९ आॅगस्टचा जिल्हा बंद हा शांततेच्या मार्गाने, परंतु गनिमी काव्याने होणार आहे. या आंदोलनाचे आवाहन करण्यासाठी ८ आॅगस्टला सायंकाळी ५ वाजता शहरातून रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजबांधवांनी सोमवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देसकल मराठ्यांची पत्रपरिषद : ८ आॅगस्टला शहरातून रॅली, शांततेला प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी होणारा ९ आॅगस्टचा जिल्हा बंद हा शांततेच्या मार्गाने, परंतु गनिमी काव्याने होणार आहे. या आंदोलनाचे आवाहन करण्यासाठी ८ आॅगस्टला सायंकाळी ५ वाजता शहरातून रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजबांधवांनी सोमवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.शासनाने मराठा समाजाच्या सर्व मागण्या विनाविलंब मान्य कराव्यात, अशी आमची मागणी असताना राज्य शासनाद्वारा दिरंगाईचे धोरण आहे. केवळ तारखांवर तारखा देऊन मराठा समाजाची दिशाभूल करण्यात येत आहे. यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे रूपांतर मराठा ठोक मोर्चात झाले आहे. २२ सप्टेंबर २०१६ ला मराठा समाजाद्वारा अमरावतीला अभूतपूर्व असा मूक मोर्चा काढण्यात आला. राज्यभरात दोन वर्षांत असे ५८ मोर्चे निघाले; परंतु याची परिणती शून्य आहे. त्यामुळेच वरिष्ठांच्या आदेशानुसार अमरावती व बडनेरात ८९ आॅगस्टला क्रांतिदिनी बंद पाळण्यात येणार आहे. यावेळी शाळा- महाविद्यालयांसह एसटी बस सेवा, शहर बस सेवेसह बाजारपेठा बंद राहणार आहेत. तालुका पातळीवरील बंद संदर्भातील नियोजन पूर्ण झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रत्येक ठिकाणी ग्रुपमध्ये मराठा बांधव सहभागी होतील. गनिमी काव्याने सर्वत्र बैठकी सुरू आहेत. आंदोलनही गनिमी काव्यानेच होईल. मात्र, गनिमी कावा कशाप्रकारचा राहणार, यावर आयोजकांनी बोलण्यास नकार दिला.आपापल्या परिसरात मराठा बांधवांनी शांततेच्या मार्गाने बंदचे आवाहन करावे. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता बाळगावी. अमरावतीला राजकमल चौकात ठिय्या देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन, सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.अत्यावश्यक सेवा सुरू राहणारजिल्हा बंददरम्यान रुग्णालय, औषधी केंद्र, अ‍ॅम्ब्यूलन्स सेवा, दूध सेवा, फायर बिग्रेड या अत्यवश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. ९ आॅगस्टला सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, ठोक व चिल्लर दुकाने, सर्व प्रकारची वाहतूक सेवा, एसटी बससेवा, शाळांच्या व्हॅन, आॅटो, मिनीबस, महापालिकेची बस वाहतूक सेवा तसेच सर्व शाळा व महाविद्यालये तसेच शिकवणी वर्ग बंद राहणार आहेत.बुधवारी शहरात मोटारबाईक रॅलीजिल्हा बंदच्या जागृतीसाठी व बंदचे आवाहन करण्यासाठी ८ आॅगस्टला मोटरबाइक रॅली काढण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता ही रॅली राजापेठवरून सुरू होईल. राजकमल चौक, जयस्तंभ, इर्विन चौक, पंचवटी शेगाव नाका, नवीन कॉटन मार्केट रोड, रामलक्ष्मण संकुल, बाबा रेस्टॉरंट मार्गे इर्विन चौक, रेल्वे स्टेशन चौक येथे समारोप करण्यात येणार असल्याचे पत्रपरिषदेत सांगण्यात आले.