शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

३२ अडत्यांचे परवाने रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:01 IST

भाजीपाला यार्डात गर्दी कमी होण्यासाठी अडते असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक २९ मार्च रोजी घेण्यात आली. यामध्ये सर्व अडत्यांनी यानंतर किरकोळ विक्री करणार नसल्याचे मान्य केले. परंतु, ४ एप्रिल रोजी पाहणी केली असता अडत्यांनी किरकोळ विक्री सुरूच ठेवल्याचे बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आले.

ठळक मुद्देबाजार समितीची कारवाई। भाजीपाल्याच्या किरकोळ विक्रीमुळे गर्दीचा ठपका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने फळे व भाजीपाला विभागात गर्दी टाळण्यासाठी किरकोळ विक्री न करण्याचे आदेश अमरावती बाजार समितीचे सभापती व सचिवांनी दिले होते. या आदेशाला न जुमानता ३२ अडत्यांद्वारा किरकोळ विक्री होत असल्याचे निदर्शनात आल्यामुळे या अडत्यांचे परवाने शनिवारी रद्द करण्यात आले व त्यांना भाजीपाला यार्डमध्ये प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे.भाजीपाला यार्डात गर्दी कमी होण्यासाठी अडते असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक २९ मार्च रोजी घेण्यात आली. यामध्ये सर्व अडत्यांनी यानंतर किरकोळ विक्री करणार नसल्याचे मान्य केले. परंतु, ४ एप्रिल रोजी पाहणी केली असता अडत्यांनी किरकोळ विक्री सुरूच ठेवल्याचे बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आले. शासनादेशाचे व बाजार समिती उपविधीचे उल्लंघन केल्याने या ३२ अडत्यांचे परवाने शनिवारपासून रद्द करण्यात येत असल्याचे आदेश बाजार समितीचे सभापती अशोक दहिकर व सचिव दीपक विजयकर यांनी काढले आहेत. या अडत्यांना भाजीपाला यार्डमध्ये विक्रीला मनाई करण्यात आली आहे. त्यांना यार्डातच प्रवेश निषेध करण्यात आले आहे. यानंतर यार्डात भाजीपाला विक्री केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे सचिव दीपक विजयकर यांनी सांगितले.कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला व 'सोशल डिस्टन्स' पाळण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह पणन संचालक सुनील पवार यांनी सर्व बाजार समित्यांना दिले आहे. याअनुषंगाने जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी पत्राद्वारे अमरावती बाजार समितीला याविषयी कळविले आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समितीद्वारा अडते असोसिएशनची बैठक घेऊन याविषयी सूचना केल्या होत्या. मात्र, सूचनेचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली.या अडत्यांवर कारवाईइंद्रपाल कालुराम वर्मा, प्रकाश रामदास शिरभाते, विजय अंबादास शिरभाते, अशोक रामदास उकंडे, मुस्ताक अहमद अ. रशीद, एस.के. सब्जी भंडार, अ. हबीब, जबी उल्हा शहा, अमरसिंग विजयसिंग ठाकूर, आसिफ महमहद इसुफ, शे. अनीस शे. हाफीज, शफी खाँ, श्रीराम बळीराम ढोले, एजाज अली विलायत अली, गणेश सिंग ठाकूर, बुधराम हरिराम चव्हाण, अर्थव चव्हाण, दिनेश कुलका चव्हाण, रोहित मधुकर देऊळकर, रवींद्र बनकर, गोकुळ रामकृपाल वर्मा, सुधाकर बाबाराव धानोरकर, रामगोपाल तिवारी, विलास शिरभाते, दीपक राखोंडे, अनंत टाके, अ. रफीक, अ, कादीर, अशलम शहदा अ. अजीज, अनिल चौकडे, राजाराम लंगडे, बिस्मिला शेख अमीर बिस्मिल्ला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या