अमरावती : राज्यात डेंग्यूने कहर केला आहे. या पार्श्वभूमीवर या जीवघेण्या आजाराबाबत महानगरात उपाययोजना करण्यासाठी महापौर पुढे सरसावल्या आहेत. तर विस्कटलेली आर्थिक घडी सावरण्यासाठी आयुक्तांनी सोमवारी आढावा बैठक घेऊन संबंधिताना आवश्यक त्या सूचना दिल्यात.महापौर चरणजित कौर नंदा यांनी महापौर कक्षात आयुक्त अरुण डोंगरे, उपायुक्त रमेश मवासी, आरोग्य अधिकारी देवेंद्र गुल्हाने, सुषमा ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य निरीक्षक, ब्युटप्युन यांची बैठक घेतली. या आढावा बैठकीत प्रभागनिहाय स्वच्छता, डास निर्मूलन अभियान, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे, साफसफाईत होणारा हलगर्जीपणा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. नागरिकांमध्ये डेंग्यूबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षक, ब्युटप्यून व आरोग्य कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली. तसेच ज्या भागात दवाखाने, रुग्णालये, शासकीय कार्यालये आहेत, त्यांनी डेंग्यूबाबतची काळजी घेण्यासाठी नोटीस बजावून अवगत करण्याचे या बैठकीत प्रामुख्याने ठरविण्यात आले.
महापौरांची डेंग्यूवर तर आयुक्तांची आर्थिक विषयांवर आढावा बैठक
By admin | Updated: November 10, 2014 22:35 IST