आयएएस पूर्वप्रशिक्षण केंद्रांच्या कामांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:13 AM2021-01-21T04:13:42+5:302021-01-21T04:13:42+5:30

अमरावती : येथील विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या परिसरातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्वप्रशिक्षण केंद्राच्या नवनिर्मित इमारत बांधकामांचा बुधवारी आमदार सुलभा ...

Review of IAS Pre-Training Centers | आयएएस पूर्वप्रशिक्षण केंद्रांच्या कामांचा आढावा

आयएएस पूर्वप्रशिक्षण केंद्रांच्या कामांचा आढावा

Next

अमरावती : येथील विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या परिसरातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्वप्रशिक्षण केंद्राच्या नवनिर्मित इमारत बांधकामांचा बुधवारी आमदार सुलभा खोडके यांनी पाहणी करून आढावा घेतला.

आयएएस पूर्वप्रशिक्षण केंद्राच्या स्वतंत्र इमारत बांधकामाची गतीने पूर्तता होण्यासाठी आमदार सुलभा खोडके यांनी शासनाकडून १ कोटी ३४ लाखांचा निधी मंजूर करून आणला. आगामी काळात या केंद्राच्या विस्तारित सेवा लक्षात घेता शासनाकडून अधिक निधी मंजूर करून आणणार असल्याचा विश्वास आ. खोडके यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, संचालिका संगीता यावले-पकडे, माजी संचालक मुरलीधर वाडेकर, विलास मानकर, कार्यकारी अभियंता एस.पी. थोटांगे, नितीन गभणे, श्रीकांत पाटील, अभियंता मनीषा ख्ररैय्या, सहायक अभियंता एन. प्रकाश रेड्डी, रत्नाकर वऱ्हाडपांडे, मुकुंद बडनेरकर, नीलेश चुने, प्राचार्य दिलीप काळे, माजी महापौर विलास इंगोले, किशोर शेळके, विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, नगरसेवक प्रशांत डवरे, यश खोडके, नीलेश शर्मा, प्रशांत धर्माळे, दिलीप कडू, भोजराज काळे, माजी नगरसेवक रतन डेंडुले, भूषण बनसोड, रमेश काळे, मनीष बजाज आदी उपस्थित होते.

-------------------------------

या सुविधा आहेत केंद्रात

केंद्र संचालिका संगीता यावले यांनी केंद्राच्या सोयीसुविधा अंतर्गत २४ तास अभ्यासिका, सुसज्ज ग्रंथालय, इंटरनेट सुविधा, वायफाय सूविधा, संगणक कक्ष, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रती प्रशिक्षणार्थी ४ हजार रुपये दरमहा मानधन, वसतिगृहात मुला-मुलींसाठी राहण्याची सुविधा, मराठी व इंग्रजी वर्तमानपत्रे, मासिके सुविधा, टेस्ट सिरीज सुविधा असल्याची माहिती दिली.

Web Title: Review of IAS Pre-Training Centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.