शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
4
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
5
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
6
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
7
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
8
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
9
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
10
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
11
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
12
VIRAL : जत्रेतल्या ब्रेकडान्सवर बसायला आवडतं? 'हा' व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी स्वतःला थांबवाल!
13
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
14
Viral Video: १५ पत्नी, ३० मुले आणि १०० नोकर! विमानतळावर आफ्रिकन राजाचा थाट पाहून सगळेच चक्रावले
15
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
16
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
17
Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
18
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
19
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
20
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...

अर्थ समितीने घेतला निधी जमा खर्चाचा आढावा

By admin | Updated: November 5, 2016 00:21 IST

जिल्हा परिषदेत महत्त्वाचा विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वित्त विभागातील तिजोरीतून विविध विभागांना देण्यात आलेल्या निधी खर्चाचा अर्थ समितीने आढावा घेतला.

जिल्हा परिषद : मार्चपूर्वी कामे मार्गी लावण्याचे सभापतींचे निर्देशअमरावती : जिल्हा परिषदेत महत्त्वाचा विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वित्त विभागातील तिजोरीतून विविध विभागांना देण्यात आलेल्या निधी खर्चाचा अर्थ समितीने आढावा घेतला. गुरूवारी अर्थ समितीची सभा विविध विषयाला अनुसरून उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती सतीश हाडोळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा सभा बोलविण्यात आली होती. यावेळी योजना निहाय व विकास कामांच्या मागील दोन वर्षांत महिला व बालकल्याण, सिंचन, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागाने राबविलेल्या योजना, विकास कामे, साहित्य पुरवठा आदीवर आतापर्यंत करण्यात आलेला खर्च व अखर्चित निधीचा विस्तृत आढावा घेण्यात आला. याशिवाय सन २०१६-१७ चे आर्थिक नियोजन यावरही सभेत चर्चा करण्यात आली. सभेला उपाध्यक्ष तथा अर्थ समितीचे सभापती सतीश हाडोळे, सदस्य मंदा गवई, जया बुंदिले, सुधाकर उईके, मुख्यलेखा वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, राजेश नाकिल, पी.जी. मोंढे, मनीष गिरी, डेप्युटी सीईओ कैलास घोडके, कार्यकारी अभियंता प्रमोद तलवारे, के.टी. उमाळकर, पशुसंर्वधन अधिकारी पुरूषोत्तम सोळंके, डीएचओ नितीन भालेराव आदींची उपस्थिती होती. सभेत सभापतींनी विभागानिहाय घेतलेल्या आढाव्यात महिला बालकल्याण विभागाने सन २०१४-१५ मधील प्राप्त निधीचा खर्च पूर्ण केला आहे. यावर्षीचे नियोजन अंतीम टप्यात असल्याचे या विभागाचे अधिकारी घोडके यांनी सांगितले. पशुसंवर्धन विभागाने यावर्षी ५० लाख रूपयांचा मका खरेदीचे आदेश महाबीज व नॅशनल कार्पोरेशनला दिले आहेत. कामधेनू दत्तक योजनेत जिल्ह्यातील १९ गावांचा समावेश आहे. या गावात पशुधनाशी संबंधित विविध उपक्रम राबविले जात आहेत. हा निधी पंचायत समितीला वर्ग करण्यात आला आहे. याअंतर्गत प्रचार प्रसिध्दीसाठी स्थानिक पातळीवरच निर्णय घेऊन अंमलबजावणी केली जात असल्याचे सभापती हाडोळे यांनी विचारलेल्या प्रश्नावर संबंििसंचन विभागाला उपलब्ध झालेला निधी काही योजनावर पूर्ण खर्च करण्यात आला आहे. तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. आदिवासी, बीगर आदिवासी क्षेत्रात सिंचनाची कामे करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. जलयुक्त शिवार, भूसंपादन व सर्वेक्षण आदी साठी निधीची आवश्यकता आहे. तर काही निधी तांत्रिक अडचणीमुळे परत जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या देखभाल दुरूस्ती व नुतनीकरणासाठी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली आहे. आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या निधीतून औषध खरेदी, दुर्र्धर आजारी रूग्णांना अनुदान व अन्य कामांवर हा निधी खर्च होणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन भालेराव यांनी सांगितले. तसेच पाणीपुरवठा विभागाकडे विविध योजनावर करण्यात आलेला खर्च व नियोजन याची माहिती कार्यकारी अभियंता उमाळकर यांनी दिली. (प्रतिनिधी)सायकल, मशीन, खरेदीची प्रक्रिया सुरूजिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत यंदा सायकल, पिकोफॉल शिलाई मशीन ड्रेस डिझायनिंग, संगणक प्रशिक्षण आदीबाबत नियोजन करण्यात आले आहे. सुमारे ३५ लाख रूपयांच्या सायकली, तर ५० लाखांच्या पिकोफॉल शिलाई मशीन खरेदी केली जाणार आहे. अर्थ समितीच्या बैठकीत खर्च व आगामी नियोजन याचा आढावा घेतला असता त्यात ही माहिती देण्यात आली.तीन विभागप्रमुखांची सभेला दांडीजिल्हा परिषद अर्थ विषय समितीची सभा ३ नोव्हेबर रोजी सभा बोलविण्यात आली. यावेळी सुरूवातील गैरहजर अधिकाऱ्यांची माहिती घेण्यात आली. यात समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम या तीन विभागांचे खातेप्रमुख उपस्थित नव्हते. त्यामुळे सभापतींनी नाराजी व्यक्त केली. तर कृषी विभागाचे अधिकारी यांनी परवानगी घेतल्याचे सभेच्या सचिवांनी सांगितले.