शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कारवाईविरुद्ध महसूल कर्मचारी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2017 00:09 IST

शासकीय कर्तव्य बजावत असताना खोट्या फिर्यादीच्या आधारे धामणगाव येथील नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठ्यावर अ‍ॅट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल करणाऱ्या ...

कामबंद आंदोलन : कामकाज ठप्प, विभागात कामबंदचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासकीय कर्तव्य बजावत असताना खोट्या फिर्यादीच्या आधारे धामणगाव येथील नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठ्यावर अ‍ॅट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करून गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. सोमवारी या मागणीसंदर्भात निवेदन देण्यासाठी सर्व संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.शुक्रवारपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महसुली कामकाज ठप्प झाले आहे. मागणी मान्य न झाल्यास अमरावती विभागात कामबंद आंदोलन करण्याचा ईशारा आंदोलनात सहभागी चारही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी रीतसर महसूलच्या अधिकाऱ्यांची परवानगी न घेताच परस्पर गुन्हे दाखल केलेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल खचले आहे. यापुढे कामे कशी करावीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याविरुद्ध तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना, विदर्भ पटवारी संघटना, महसूल कर्मचारी संघटना व मंडळ अधिकारी संघटना एकवटल्या आहेत. या संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उगारून सात जुलैपासून महसुली कामकाज बंद केले आहे. तहसीलदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र मालठाने, महसूल संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव गडलींग, महसूल अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेषराव लंगडे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष उगले यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व कर्मचारी उपस्थित होते.