विभागीय आयुक्तांना निवेदन : दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धामणगाव रेल्वे येथील सेवानिवृत नायब तहसीलदार, मंडल अधिकारी व तलाठी यांच्यावर शासन कर्तव्य बजावत असताना खोट्या फिर्यादीवर पोलीस विभागाने अॅट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे त्वरित मागे घ्यावे व गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी शुक्रवार पासून कामबंद आंदोलन सुरू केले. व मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले.धामणगाव रेल्वे येथील नायब तहसीलदार कोहरे, मंडळ अधिकारी व तलाठी हे शासकीय कर्तव्य बजावीत असताना त्यांच्या विरोधात कुऱ्हा पोलीस ठाण्यात तक्रारीची कुठलीही शहानिशा न करता व महसूल विभागाच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांची रीतसर परवानगी न घेता गुन्हे दाखल करण्यात आले. या अन्याविरोधात महसूल अधिकाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना, महसूल कर्मचारी संघटना, मंडळ अधिकारी संघटना व विदर्भ पटवारी संघटना आदिंनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन व्यापक करण्यात येईल असे निवेदनाव्दारे स्पष्ट केले आहे.
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कामबंद
By admin | Updated: July 8, 2017 00:07 IST