शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

अवैध वीटभट्ट्यांना महसूल विभागाचे अभय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 01:14 IST

परिसरातील श्रीक्षेत्र कोंडेश्वर मार्गावर वीटभट्ट्या मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने उन्हाळ्याची चाहूल लागताच उष्णतेचे परिणाम जाणवू लागले आहे. त्यामुळे येत्या शिवरात्रीच्या पर्वावर या मार्गाने हजारो भाविक ये-जा करतात. मात्र, या वीटभट्टयांची उष्णता आतापासूनच नकोशी वाटत असल्याने महसूल विभागाने या अवैध वीटभट्टा त्वरित बंद कराव्या, ......

ठळक मुद्देकोंडेश्वर मार्ग धोक्याचा : उन्हाळ्यात होणार जिवाची लाही-लाही

श्यामकांत सहस्त्रभोजने ।लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : परिसरातील श्रीक्षेत्र कोंडेश्वर मार्गावर वीटभट्ट्या मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने उन्हाळ्याची चाहूल लागताच उष्णतेचे परिणाम जाणवू लागले आहे. त्यामुळे येत्या शिवरात्रीच्या पर्वावर या मार्गाने हजारो भाविक ये-जा करतात. मात्र, या वीटभट्टयांची उष्णता आतापासूनच नकोशी वाटत असल्याने महसूल विभागाने या अवैध वीटभट्टा त्वरित बंद कराव्या, अशी मागणी असताना महसूल विभागाचे याला अभय का, असा सवाल त्रस्त भाविक व कामगार करीत आहे.वीटभट्ट्यांचा व्यवसाय बडनेऱ्यात मोठ्या प्रमाणात आहे. अमरावती शहराला वाहतुकीस सोयीचे जात असल्याने याच भागातील विटा बांधकामाकरिता वापरण्यात येते. यातील काही वीटभट्ट्या नियमसंगत चालू आहेत. मात्र, बहुतांश शासकीय जागेत अवैध वीटभट्ट्या सुरू केल्याने धूर मोठ्या प्रमाणात पसरतो. परिणामी आजूबाजूच्या पिकांवरसुद्धा त्याला विपरीत परिणाम जाणवू लागला आहे. तसेच विटा भाजल्यानंतर स्थलांतरण करताना मोठ्या प्रमाणात धूळ वातारवणात पसरल्याने या मार्गावरून ये-जा करणाºया वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. कोंडेश्वर मार्गालगच एक्सप्रेस हायवे असल्याने जड वाहनांसह अनेक वाहने धावतात. यावरदेखील धुळीचा परिणाम जाणवत आहे.या परिसरात प्रसिद्ध असलेले कोंडेश्वर देवस्थानात भाविकांची नियमित दर्शनाकरिता जे-जा सुरू असल्याने या मार्गावरील अवैध वीटभट्ट्या शासनाने त्वरित हटवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.महसूल विभाग घेतील काय दखल?कोंडेश्वर मार्गावरील अवैध वीटभट्ट्या हटविण्यासंदर्भात 'लोकमत'ने वारंवार हा मुद्दा लोकदरबारात मांडला. मात्र, महसूल विभागाने यावर अपेक्षित कारवाई अद्यापही केलेली नाही. त्यामुळे आता तरी याची दखल महसूल विभागाने घ्यावी, अशी अपेक्षा त्रस्त भाविकांनी व्यक्त केली आहे.वीटभट्यांच्या उष्णतेने उन्हाळा होणार असह्यउन्हाळ्याच्या दिवसांत वीटभट्या सुरू झाल्यानंतर या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना उष्णतेचे चटके असह्य होऊ लागतात. त्यामुळे अवैध वीटभट्ट्या हटविणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.तहसीलदारांनी जाणावे गांभीर्यकोंडेश्वर तसेच जुना बायपास मार्गावरून भाविक व कामगारांना उन्हाळ्यात ये-जा करणे फार कठीण जाते. शरीर भाजल्यागत वेदना सहन कराव्या लागतात. त्यामुळे या समस्येचे गांभीर्य ओळखून त्वरित कारवाई करावी, अशी मागणी एमआयडीसीतील कामगारांनी केली आहे.