शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

२२ लाखांच्या महसुलात सूट

By admin | Updated: April 18, 2016 23:56 IST

जिल्ह्याची सुधारित व अंतिम पैसेवारी ५० पैशांच्या आत आल्याने शासनाने जिल्ह्यातील १ हजार ९६७ गावांत दुष्काळस्थिती जाहीर केली.

दुष्काळाची सवलत : ४ लाख ३३ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभगजानन मोहोड अमरावतीजिल्ह्याची सुधारित व अंतिम पैसेवारी ५० पैशांच्या आत आल्याने शासनाने जिल्ह्यातील १ हजार ९६७ गावांत दुष्काळस्थिती जाहीर केली. त्यामुळे २ हेक्टर शेती असणाऱ्या ४ लाख ३३ हजार ८०४ शेतकऱ्यांचा किमान २२ लाखांवर जमीन महसूल माफ होणार आहे. जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळीस्थिती आहे. मागील वर्षी ैपैसेवारी ४३ पैसे होती. यावर्षी देखील ४३ पैसेच पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. त्यामुळे शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट मिळणार आहे. किंबहूना दुष्काळी प्रदेशात मिळणाऱ्या सोयी-सवलतींमधील ही एक प्रमुख सवलत आहे. जिल्ह्यात ५ एकराखालील ३ लाख ११ हजार ११५ शेतकरी व ५ एकरावरील १ लाख १४ हजार ८०४ शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना जमीन महसूलात सूट या सवलतीचा लाभ मिळणार आहे. अल्प व अत्यल्प भूधारकांकडून शेतसारा वसूल केला जात नाही. दरवर्षी शेतकऱ्यांकडून सामान्य जमीन महसूल, वाढीव जमीन महसूल, संकिर्ण महसुलासह अन्य महसुलाची वसुली शासन करीत असते. यापैकी सामान्य जमीन महसूल हा प्रतिएकर २० रुपयादरम्यान असतो. जिल्ह्यात ५० पैशांच्या आत पैसेवारी आल्याने २२ लाखांवर महसूल माफ होणार आहे. तलाठी साधारणपणे आॅक्टोबर ते नोव्हेंबरपासून जमीन महसूल गोळा करतात. मात्र पैसेवारी कमी आल्याने यावर्षी जमीन महसूलात शेतकऱ्यांना सूट मिळणार आहे. दुष्काळ उशिरा जाहीर झाल्याने शेतसाऱ्याची झाली वसुलीशासनाने खरिपाची सुधारित पैसेवारी व कमी पर्जन्यमान या निकषावर विभागातील फक्त बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळ घोषित केला. त्यामुळे हा जिल्हा वगळता उर्वरित चारही जिल्ह्यांत महसूल विभागाने ३१ मार्चपर्यंत शेतसारा वसूल केला. अमरावती जिल्ह्यात शासनाने २३ मार्च रोजी दुष्काळ स्थिती जाहीर केली. परंतु तलाठीवर्गाने ३१ मार्चपर्यंत जमीन महसुलाची वसुली केली. हा शेतसारा शेतकऱ्यांना परत मिळायला हवा, अशी मागणी आहे. जिल्ह्यात चार लाखांवर खातेदारमहसूल विभागाच्या नोंदीनुसार जिल्ह्ह्यात ४ लाख ३३ हजार ५४६ शेतकरी खातेदार आहेत. यापैकी ५ एकराच्या आतील ३ लाख ११ हजार ११५ शेतकरी खातेदार असून त्यांना जमीन महसूल माफ किंवा विशेषत्वाने महसुलाची कमी आकारणी केली जाते तर ५ एकरावरील १ लाख १४ हजार ८०४ खातेदार आहेत. त्यांचा जमीन महसूल आता माफ होणार आहे. जिल्ह्यातील १९६७ गावांमधील पैसेवारी ५० पैशांच्या आत आहे. साधारणत: २० ते २२ लाखांचा महसूल दरवर्षी जमा होतो. दुष्काळस्थिती झाल्याने या महसुलात शासन सूट देते. - शंकर शिरसुद्धे, उपजिल्हाधिकारी (महसूल)