शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
5
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
6
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
7
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
8
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
9
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
10
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
11
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
12
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
13
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
14
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
15
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
16
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
17
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
18
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
19
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
20
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
Daily Top 2Weekly Top 5

परतवाडा-इंदूर मार्गावर कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात, चार जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 17:29 IST

परतवाडा ते इंदूर मार्गावर घटांगनजीक कार व ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन वाहनांनी पेट घेतला. या दोन्ही वाहनांचा अक्षरश: कोसळा झाला. या अपघातात कारमधील चौघे जखमी झालेत.

परतवाडा, दि. 21 - परतवाडा ते इंदूर मार्गावर घटांगनजीक कार व ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन वाहनांनी पेट घेतला. या दोन्ही वाहनांचा अक्षरश: कोसळा झाला. या अपघातात कारमधील चौघे जखमी झालेत. ही घटना गुरूवारी दुपारी १२.३० वाजता घडली. परिणामी या मार्गावरील सर्व वाहतूक तीन तास ठप्प झाली होती.पथ्रोट येथून खकनारसाठी जाणा-या टाटा ४०७ ला विरूद्ध दिशेने भरधाव येणा-या कारची धडक बसली. क्षणात कारने पेट घेतला. कारमधील दोन पुरूष व दोन महिला जखमी झाल्याने ट्रकचालक अ.राजीक अशफाक (रा.पथ्रोट) यांनी त्यांना बाहेर काढले. तोपर्यंत ट्रकनेही पेट घेतला होता. दोन्ही वाहने धगधगू लागल्याने बघ्यांची गर्दी विखुरली. लगेच चिखलदरा पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत दोन्ही वाहनांची राखरांगोळी झाली होती. पथ्रोट येथून खकनारसाठी जाणा-या ट्रकमध्ये संत्री भरण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिकचे रिकामे कॅरेट होते. अपघातग्रस्त ट्रकचा क्रमांक एम.एच.-४३एफ.७५९१ असून कार मात्र पूर्णत: जळाल्याने नंबर व जखमींची नावे वृत्त लिहेस्तोवर मिळू शकली नव्हती.

वाहतूक ठप्प...परतवाडा-धारणी-इंदूर मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असल्याने घटनेनंतर दोन्ही बाजूची वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. आग आटोक्यात आल्यावर वाहतूक सुरळीत झाली. कारमधील जखमी प्रवाशांना अचलपूर व चिखलदरा येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल न केल्याने त्यांच्याबद्दल माहिती मिळू शकली नाही. चिखलदरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

टॅग्स :Accidentअपघात