शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

परतीचा पाऊस, सोयाबीनचे मातेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 23:00 IST

  यंदाच्या हंगामात तब्बल ८४ महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. सर्वच तालुक्यात पावसाची सरासरी पार झालेली आहे. अतिवृष्टी शिवाय ५ जुलैपासून सतत पाऊस सुरू असल्याने दोन लाख हेक्टरमधील सोयाबीनचे आधीच नुकसान झालेले आहे. यातून शेतकरी सावरत नाही तोच पाच दिवसांपासून पुन्हा पाऊस सुरू झाल्याने काढणीच्या हंगामात सोयाबीन मातीमोल होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  सोयाबीन काढणीच्या हंगामात पावसाने पुन्हा रिपरिप लावल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पावसाने गंज्या भिजल्या तर शेतात पाणी साचल्याने उभे सोयाबीन सडायला लागल्याने मातेरे झाले झाले आहे. प्रतवारी खराब झाल्याने व्यापारी पडून मागत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  यंदाच्या हंगामात तब्बल ८४ महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. सर्वच तालुक्यात पावसाची सरासरी पार झालेली आहे. अतिवृष्टी शिवाय ५ जुलैपासून सतत पाऊस सुरू असल्याने दोन लाख हेक्टरमधील सोयाबीनचे आधीच नुकसान झालेले आहे. यातून शेतकरी सावरत नाही तोच पाच दिवसांपासून पुन्हा पाऊस सुरू झाल्याने काढणीच्या हंगामात सोयाबीन मातीमोल होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगणी करून गंजी लावल्या होत्या, त्यामध्ये पाणी शिरल्याने सोयाबीन सडायला लागले आहे. पावसामुळे सोयाबीनच्या शेंगामधून बिजांकुर फुटत आहे. याशिवाय उशिरा पेरणी झालेल्या सोयाबीनची कायिक वाढ झाल्याने शेंगा कमी व पोचत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.पावसाने सोयाबीनची प्रतवारी कमी झालेली आहे. त्यामुळे व्यापारी भाव पाडून मागत आले. महिनाभरापूर्वी ५ ते ६ हजारांपर्यंत असलेला भाव आता चार हजारांवर आलेला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तोंडचा घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच शेतमाल पडून मागत असल्याने नाफेड केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे. 

अर्ध्याअधिक तुरीवर ‘मर’सततचा पाऊस अतिवृष्टीमुळे शेतात तलाव साचल्याने तुरीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन ‘मर’ रोगाने तूर जागेवरच सुकायला लागली आहे.  जिल्ह्यात किमान ५० हजार हेक्टरवर हे संकट ओढावलेले आहे. तुरीला यंदा चांगला भाव असताना पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कपाशीवर बोंडसड अन् बोंडअळीसततच्या पावसाने कपाशीच्या बोंडावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामध्ये बोंड सडून गळ सुरू झालेली आहे. याशिवाय शेतात पाणी साचल्याने ‘पॅराविल्ट’मुळे कपाशी जागेवरच सुकायला लागली आहे. याशिवाय बोंडअळीला पोषक वातावरण असल्याने प्रादुर्भाव वाढला. 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती