शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

जिल्ह्यातील जलाशयांवर आलेल्या स्थलांतरीत पक्ष्यांचा परतीचा प्रवास

By admin | Updated: March 18, 2015 00:25 IST

हिवाळ्यात देशविदेशातून स्थंलातरण करुन आलेल्या पक्षांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. विविध पक्षांचे थवेच्या थवे मायदेशी परत जाताना दिसून येत आहे.

वैभव बाबरेकर अमरावतीहिवाळ्यात देशविदेशातून स्थंलातरण करुन आलेल्या पक्षांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. विविध पक्षांचे थवेच्या थवे मायदेशी परत जाताना दिसून येत आहे. तलावावरील प्रदुषित वातावरण व मानवी हस्तक्षेपामुळे स्थंलातरीत पक्षांची संख्या यंदा रोडावल्याने वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांनी चिंता व्यक्त केली आहे. हिवाळ्यातील बोचऱ्या थंडीच्या दिवसात अनेक विदेशी पक्षी महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतातील नद्या, तलाव व इतर पाणथळीची वास्तव्यास असतात. जंगलातील वृक्षावर किलबिलाट करीत ते त्यांच्या अस्तित्वाची जाणिव करुन देतात. मात्र आता स्थंलातरीत पक्षांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे, मार्च महिन्याच्या मध्यावधीत सर्व स्थलांतरित पक्षी आपआपल्या ठिकाणी परत जाताना आढळून येत आहे. जिल्ह्यातील विविध तलावावरुन परत मायदेशी जाताना पुन्हा हजारो किलोमीटर प्रवास ते करणार आहे. हे अंतर पार करण्यासाठी पोटभर अन्न खाऊन ते प्रवासाला लागले आहे. जणू काही आम्ही जातो अमुच्या गावा, आमचा निरोप घ्यावा. जिल्ह्यातील जलाशयावर आलेल्या पक्षांचे स्थलांतरण प्रदुषण व मासेमारीमुळे धोक्यात आले आहे. मात्र तरीही या सगळ्या धोक्यांचा सामना करीत पक्षांची रेलचेल यंदा पाहायला मिळाली आहे. तीच रेलचेल पुढील वर्षी पाहायला मिळेल, अशी आशा पक्षीमित्रामध्ये आहे. पक्षी राखतात निसर्गाचे संतुलन निसर्ग संतुलनात पक्षी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. विदेशातील हे पाहुणे पाण्यातील, हवेतील व वनस्पतीवरील असंख्य किटक खातात. पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. निसर्गाचे सफाई कामगार, उत्तम बीजप्रसारक व शेतकऱ्यांचे मित्र अशी त्यांची पर्यावरण संतुलनात त्यांची प्रभावी भूमिका आहे. पक्ष्यांचा हजारो किलोमिटरचा प्रवासमंगोलियामधून येणारे राजहंस तर तब्बल ४,३०० किमीचा प्रवास करून अमरावतीत येतात. काही पक्षी तर २० हजार ते ५४ हजार कि.मि. पर्यंतचा प्रवास करतात. पक्षी हे साधारणत: ताशी ४० ते ६० कि.मी. वेगाने उडतात. क्रौंच पक्षी दिवसाला सरसरी २४० की.मी. प्रवास करतात. स्थलांतरित पक्षी हे आठ ते दहा हजार फूट उंचीपर्यंत उडू शकतात. स्थलातरणा दरम्यान पक्षी दिवसा व रात्रीही प्रवास करतात. हिमालयाकडून केरळ भागात म्हणजेच पक्ष्यांचे स्थलांतर हे देशांतर्गतही असते. काही आर्टिक्ट ते अंटार्टीक म्हणजे देशाबाहेरूनही आपल्याकडे येतात. सायबेरियामधून येणारे क्रौंच व साधा करकोचा, मंगोलियावरून येणारा राजहंस किंवा पट्ट कदंब ही त्यातलीच काही उदाहरणे आहेत.पक्षी मित्रांमध्ये कुतूहलस्थंलातरीत पक्षांच्या हालचाली टिपण्याचा छंदातून पक्षीपे्रमी अभ्यासात्मक दृष्टीकोन ठेवतात. पक्ष्यांचा अभ्यास व निरीक्षणे करण्यासाठी, त्यांची छायाचित्रे टिपण्यासाठी अनेक पक्षीप्रेमी त्यांची वाटच पाहत असतात. पर्यायाने यांच्यातही निसर्गाप्रती संवेदना व प्रेम निर्माण होते. आज विविध ठिकाणी निसर्ग वाचविण्यात ते आपले आयुष्य खर्ची घालताहेत. असे मत वन्यजीव अभ्यासक यादव तरटे व स्वप्नील रायपूरे यांनी व्यक्त आहे.