शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हरविलेले मोबाईल नागरिकांना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 23:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हरविलेले मोबाइल ट्रेस करून शोधलेले ३० मोबाइल सायबर पोलिसांनी सोमवारी नागरिकांना परत केले. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या हस्ते ते मोबाइल संबंधित नागरिकांच्या स्वाधीन करण्यात आले. १ एप्रिल रोजी सायबर ठाणे सुरू झाल्यानंतर पोलिसांनी ३० मोबाइल ट्रेस करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.शहर पोलीस आयुक्तालयातील सभागृहात सोमवारी मिसिंग ...

ठळक मुद्देमिसिंग मोबाईल : सायबर पोलिसांकडून ट्रेस, ३० जणांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हरविलेले मोबाइल ट्रेस करून शोधलेले ३० मोबाइल सायबर पोलिसांनी सोमवारी नागरिकांना परत केले. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या हस्ते ते मोबाइल संबंधित नागरिकांच्या स्वाधीन करण्यात आले. १ एप्रिल रोजी सायबर ठाणे सुरू झाल्यानंतर पोलिसांनी ३० मोबाइल ट्रेस करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.शहर पोलीस आयुक्तालयातील सभागृहात सोमवारी मिसिंग मोबाइल परत करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायबर ठाण्याच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महिनाभरात हरविलेल्या मोबाइलचे शोधकार्य केले. मोबाईल ट्रेस करून ते वापरणाऱ्या नागरिकांकडून जप्त केले. जप्त केलेल्या ३० मोबाइलची किंमत ३ लाख ३५ हजार ४४८ रुपये आहे. मागील दोन वर्षांत शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतून ७०० च्या जवळपास नागरिकांचे मोबाईल हरविले आहेत. या मोबाइलचा शोध सायबर ठाण्याचे पोलीस करीत असून सद्यस्थितीत ३० मोबाईल ट्रेस करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.बहुतांश मोबाइल नागपुरी गेट हद्दीतून जप्तहरविलेले मोबाइल ट्रेस झाल्यानंतर त्यापैकी सर्वाधिक मोबाइल नागपुरी गेट व खोलापुरी गेट हद्दीतील नागरिकांजवळ असल्याचे निदर्शनास आले. सायबर पोलिसांनी संबंधित व्यक्तींकडून ते मोबाइल जप्त करण्यात आले. याच परिसरात बहुतांश मोबाइल चोर आढळून आले असून, हे मोबाइल हरविलेले होते की, चोरण्यात आले याबाबत संभ्रम कायम आहे.ट्रेसिंगसाठी सायबर टीमचे परिश्रमहरविलेले मोबाईल ट्रेस करणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सत्कार केला. सहायक पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्यासोबतच पोलीस उपनिरीक्षक ईश्वर वर्गे, पोलीस शिपाई सुधीर चर्जन, सचिन भोयर, गोपाल सोळंके यांनी अथक परिश्रम घेतले.यांना मिळाले मोबाईलसंदीप भादर्गे, नितू वाघमारे, जितेंद्र शर्मा, सचीन गुप्ता, खुशबु साहू, अभिजीत रहाटे, सुरेश मालाणी, प्रशांत हाडे, ऋषिकेश राठी, राहुल कोंडे, अशलेश चौधरी, अशोक वाटेकर, दिलीप आहुजा, आदित्य खंडलेवार, आदीत्य कोरडे, सौरभ निगोंट व मुकुंद इंदुरकर यांना सोमवारी मोबाईल परत करण्यात आले.