ऑटो रिक्षाचालकाची अस्खलित इंग्रजी; मिस ग्लोरियांनी शिकवली परदेशी भाषा
अमरावती : ऑटो मागे लिहिलेल्या इंग्रजी म्हणी अमरावतीमध्ये कमीच पहायला मिळतात. ती दिसली म्हणून तिच्याकडे आपसुकच नजर जाते. त्याच्या चालकाकडे चौकशी केली असता ते एखाद्या तरुणाला लाजवेल असे इंग्रजी बोलायला लागले, ते होेते. जगदीश रामलखन यादव. ते श्यामनगर येथे राहतात. ते ६५ वर्षांचे आहेत.
मिस ग्लोरीया यांनी त्यांना ३५ वर्षापुर्वी परदेशी भाषा शिकविण्याचे कबूल केले ,मात्र त्यांनी शिकविण्यापूर्वी त्यांच्या काही अटी घालुन दिल्या त्या अश्या की तूम्ही मद्यपान कधी करणार नसणार तर मि तुम्हाला विना मानधना घेता भाषा शिकवीते,त्यांनी ती मान्य सुध्दा केली त्यावेळी यादव हे गरीब ऑटो ड्रायव्हर होते.त्यामूळे त्यांची सुद्धा फी भरण्याची सुध्दा परीस्थिती नव्हती.परंतु शिकण्याची मात्र जिद्दद होती.त्यामुळे ते इंग्रजी भाषा शिकले.महाविद्यालयीन तरूणाही लाजवेल अशी भाषा ते बोलू लागले.
शिकण्याची व शिकवण्याची जिद्द त्यांची असल्याकारणाने त्यांनी त्यांच्या मुलीला सुध्दा चांगल्या प्रकारे चे शिक्षण दिले.सद्या ही ते त्यांच्या मुलीला शिकवणी करीता रोज संध्याकाळी आपल्याच ऑटो मधुन सोडतात आणि घ्यायला जातात. यादव हे आपले ऑटो चालवण्याचे काम हे रोज सकाळ पासुन तर संध्याकाळ पर्यंत करतात.म्हणून ते स्वत: म्हणतात की , 'आय एम टार्यड बट नॉट रीटार्यड' म्हणून च त्यांची प्रकृती अजून चांगली आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची व्याधी नाही. ते ६५ वर्षांचे आहे.
ते ब्रीटीश काळातील १० वी वर्ग पास झालेले आहेत. ते म्हणतात, लहानपणी मी माझ्या लहान मुलीला शिकविले. मात्र आता ती मला शिकवीत आहे