नऊ नगरपरिषदांची निवडणूक : मुदतपूर्व तीन महिने नवीन कामांना मनाईअमरावती : जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांचा कार्यकाळ हा २७ डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. त्यापूर्वी तीन महिने कालावधीत नवीन कामे मंजूर करण्यास व स्वेच्छानिधीचा वापर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधींना मनाई केली आहे. दरम्यान या सर्व ठिकाणी मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी करण्यात आली असल्याने येत्या २० आॅक्टोबरच्या आत या ठिकाणी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकांपूर्वी काही लोकप्रतिनिधी मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी स्वेच्छा निधीचा वापर करतात. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच्या कालावधीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वेच्छा निधी खर्च करण्यावर कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाही. मात्र या निवडणुका निर्भीड व पारदर्शक होण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने ५ आॅक्टोबरच्या आदेशान्वये निर्बंध घालण्यात आले आहे. निवडणुकांपूर्वी काही लोकप्रतिनिधी मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी स्वेच्छा निधीचा वापर करतात. निवडणूक कार्यक्रम जाहिर होण्यापूर्वीच्या कालावधीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवणुकांमध्ये स्वेच्छा निधी खर्च करण्यावर कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाही. मात्र या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक होण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने ५ आॅक्टोबरच्या आदेशान्वये निर्बंध घालण्यात आले आहे. मतदारांना लोकप्रतिनिधीकडून आमिष देण्याच्या प्रकाराला या आदेशामुळे फटकार बसला आहे.- तर अधिकाऱ्यांवर कारवाईअमरावती : आदेशान्वये सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकीत संबंधित कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपण्याच्या तीन महिने अगोदर किंवा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून यापैकी जो दिनांक अगोदर असेल त्या दिनांकापासून कोणत्याही लोकप्रतिनिधीला त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रातील कामांवर स्वेच्छा निधी खर्च करता येणार नाही. अधिकाऱ्यांनी कोणत्याही नवीन कामांना मंजुरी देऊ नये. मात्र या दिनांकापूर्वी प्रस्ताव मंजूर असेल परंतु प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नसेल तर कामाचे कार्यरंभाचा आदेश देऊ नये, असे निर्देश आयोगाने दिले आहे.अंतिम मतदार यादी शनिवारी प्रसिद्धराज्य निवडणूक आयोगाचे आदेशान्वये जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगाव सुर्जी, वरूड, चांदूरबाजार, मोर्शी व शेंदूरजनाघाट या नऊ नगरपरिषदांमध्ये प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी शनिवार १५ आॅक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे या सर्व ठिकाणी कुठल्याही क्षणी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
२७ सप्टेंबरपासून विकास कामांवर बंधने
By admin | Updated: October 16, 2016 00:09 IST