शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील प्रत्येक ठाण्यात महिला पोलिसांसाठी विश्राम कक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 18:14 IST

पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची ग्वाही

अमरावती : नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र झटणाºया महिला पोलिसांना विश्रांतीची आवश्यकता असते. त्याअनुषंगाने राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात विश्राम कक्ष निर्माण करण्याचे ध्येय ठेवून कामकाज सुरु आहे. लवकरच सर्व ठाण्यांमध्ये महिलांचे विश्रांती कक्ष तयार होतील, अशी ग्वाही राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी दिली.  फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात अमरावती शहरातील पहिल्या महिला विश्रांती कक्षाच्या उद्घाटन समारंभात पडसलगीकर अध्यक्षीय भाषणात बोलत होते. बुधवारी सकाळी राज्याचे पोलीस महासंचालक पडसलगीकर यांनी प्रथम पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यस्थेसंदर्भात विभागाचा आढावा घेतला.  त्यानंतर त्यांनी फे्रजरपुरा ठाण्यातील महिला विश्रांती कक्षाचे उद्घाटन केले. यावेळी पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, शशिकांत सातव, प्रदीप चव्हाण, पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्यासह पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांची उपस्थिती होती. पुढे बोलताना पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर म्हणाले की, राज्यातील सर्वच ठाण्यात महिला विश्रांतीगृह निर्माण करण्याचे ध्येय आहे. त्यानुसार कामकाज सुरू झाले आहे. अमरावतीच्या फे्रजरपुरा ठाण्यात महिलांसाठी विश्रांती कक्ष सुरू झाल्यामुळे महिला पोलिसांना चांगलाच फायदा होईल. पोलिसांची नोकरी धकाधकीची आहे. त्यांना विश्रांतीची आवश्यकता असते. ज्या ठिकाणी विश्रांती कक्ष नाहीत, तेथे हा कक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे पडसलगीकर यांनी सांगितले. या उद्घाटन समारंभाचे संचालन पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित आणि आभार प्रदर्शन पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी केले. यावेळी शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस निरीक्षक, शांतता समिती, दक्षता समिती, मोहल्ला कमिटीसह गणमान्य नागरिक उपस्थित होते. 

अमरावतीत आल्याचा आनंद पडसलगीकर यांचे अमरावतीशी जुनेच नाते आहे. ते म्हणाले की, १९८४ मध्ये मी अमरावतीत प्रशिक्षणार्थी कालावधीत सेवा दिली. त्यावेळची अमरावती आणि आताच्या अमरावतीत प्रचंड बदल घडला आहे. मात्र, या शहराशी परिचित असल्यामुळे मला आनंद होत आहे. त्यावेळी फ्रेजरपुरा ठाणे नव्हते, तर हा जगंल परिसर होता. अमरावतीत मिळालेल्या प्रेमापोटी मी येथे आलो; नागरिकांशी जवळीक साधण्यासाठी उपस्थित राहिलो, असे भावोद्गार त्यांनी काढले. 

कम्युनिटी पोलिसिंगसाठी आढावा बैठकपोलीस महासंचालकांनी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील सभागृहात विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी पाचही जिल्ह्यांच्या वरिष्ठ पोलिस अधिकाºयांना आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिशानिर्देश दिले. समाजातील नागरिकांशी जवळीक व संवाद साधून कामे करा, 'सोशल व कम्युनिटी पोलिसिंग'वर भर द्या, असे पोलीस अधिकाºयांना सांगितले. आढावा बैठकीनंतर पडसलगीकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जिल्ह्यातून प्राप्त झालेले प्रस्ताव निकाली काढण्याचे प्रयत्न करू. शहर व ग्रामीण पोलिसांच्या अडीअडचणी सोडविण्याचे प्रयत्न करू. पोलिसांच्या क्वार्टरला मंजुरी मिळाली आहे; ती लवकरात लवकरच व्हावी या दृष्टीने मी कामांना गती देईल, अशी ग्वाही डीजी पडसलगीकर यांनी दिली.