शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत ठणठणाट, कामे बांधकाम विभागाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : महापालिकेला मूलभूत सुविधेसाठी मिळणारा निधी दोन वर्षांपासून बांधकाम विभागाकडे वळविल्याने महापालिकेत विकासाची बोंबच आहे. ...

ठळक मुद्देमूलभूत विकासकामांचा निधी : दोन वर्षांत निधीला ठेंगा, कामे वर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेला मूलभूत सुविधेसाठी मिळणारा निधी दोन वर्षांपासून बांधकाम विभागाकडे वळविल्याने महापालिकेत विकासाची बोंबच आहे. महपालिकेसाठी येणाऱ्या निधीतून येथीलच यंत्रणेमार्फत ही कामे व्हावीत, यासाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न थिटे पडल्याचा आरोप होत आहे. महापालिकेकडे निधीची कमतरता व येणारा निधी हा बांधकाम विभागाला वर्ग होत असल्याने येथील चहलपहलच मंदावली आहे.महापालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांचा विकास योजनेंतर्गत शासनाने वेळोवळी महापालिकेला निधी उपलब्ध करून दिला असला तरी ही सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आलेली आहेत. दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे ५० कोटींची कामे ही सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारा शहरात करण्यात आलीत. त्यामुळे महापालिकेची कामे असली तरी अधिकार मात्र, नसल्यामुळे प्रगती कशी साधणार, हा प्रश्न आता विरोधी सदस्यांनी उपस्थित केला आहे.मूलभूत विकास कामांतर्गत मिळणारा २०१६ मधील २५ कोटींच्या विकास निधीतील कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत व्हावे, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी वित्त मंत्र्यांना पत्र दिले होते. याच वर्षी मंजूर तीन कोटींच्या कामांची यंत्रणा ही बांधकाम विभागातच होती. सन २०१७ मध्ये विकास अनुदान योजनेंतर्गत झालेली १५ कोटींची कामे ही बांधकाम विभाग यंत्रणेमार्फत करण्यात आलीत. २०१७-१८ मध्ये महानगरातील १५ कामांवर १२ कोटींचा निधी शासनाने उपलब्ध केला. ही कामेदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाद्वाराच पूर्ण करण्यात आली. त्यामुळे सदर निधी महापालिकेसाठी असला तरी कामे करणारी यंत्रणा मात्र, अन्य असल्याचा प्रकार सातत्याने होत असल्याने महापालिकेची प्रगती कशी साध्य होईल, असा सवाल विचारला जात आहे.कामांचा दर्जा सुमारचसार्वजनिक बांधकाम विभागाकडे मोठ्या प्रमाणात कामे असल्याने अभियंतांद्वारा सर्व कामांकडे पुरेसे लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळे कामांचा दर्जा घसरत असल्याचा आरोप होत आहे. महापालिकेकडे यंत्रणा उपलब्ध असताना कामे नाहीत. याउलट बांधकाम विभागाकडे यंत्रणा तोकडी असताना कामे मात्र अधिक, अशी परिस्थिती आहे. याचा थेट असर कामांच्या दर्जावर होत असल्याचा आरोप पदाधिकाºयांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.कल्याणनगरचे कामसुद्धा महापालिकेचेचमहिनाभरापासून वादग्रस्त व तेवढेच चर्चित असलेले कल्याणनगरातील रस्त्यांचे चार कोटींचे काम हे महापालिका क्षेत्रात मूलभूत सोई- सुविधांचा विकास या योजनेंतर्गत मंजूर आहे. महापालिकेच्या कामांची यंत्रणा मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. महापालिकेकडे कामांची कमी असताना मंजूर कामे ही बांधकाम विभाग पळवित आहे. याकडे संबंधितांचे सोईस्कर दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका