शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
5
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
6
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
7
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
8
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
9
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
10
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
11
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
12
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
13
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
14
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
15
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
16
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
17
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
18
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
19
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
20
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला

महापौरांच्या स्वाक्षरीविनाच शासनाला पाठविला ठराव?

By admin | Updated: July 23, 2015 00:04 IST

महापालिकेत सोमवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत आयुक्तांद्वारे प्रस्तावित सहापट करवाढीला सदस्यांनी जोरदार विरोध करुन ही करवाढ दुप्पट करण्याचा ठराव मंजूर केला.

करवाढीबाबतचा प्रस्ताव : आयुक्तांच्या भूमिकेबाबत सदस्य नाराजअमरावती : महापालिकेत सोमवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत आयुक्तांद्वारे प्रस्तावित सहापट करवाढीला सदस्यांनी जोरदार विरोध करुन ही करवाढ दुप्पट करण्याचा ठराव मंजूर केला. मात्र, आयुक्तांनी सभागृहाच्या निर्णयाचे धिंडवडे काढून महापौरांच्या स्वाक्षरीविनाच करवाढीबाबतचा ठराव शासनाला पाठविल्याने सदस्य संतापले आहेत. परिणामी करवाढीवरुन आयुक्तविरुद्ध सदस्य असा संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत.आयुक्त चंद्रकांत गुडेवार बुधवारी विमानाने मुंबई येथे मंत्रालयात आयोजित स्मार्ट सिटी संदर्भाच्या बैठकीला गेल्याची वार्ता पदाधिकाऱ्यांना मिळाली. स्मार्ट सिटीच्या प्रस्तावासह अतिरिक्त आणि विनापरवानगी बांधकाम, मालमत्तांवर कर आकारणीबाबतचा ठराव आयुक्तांनी मंत्रालयात नेल्याचे त्यांना कळले. परंतु हा ठराव महापौरांनी मंजूर केला नसताना तो आयुक्तांनी शासनाकडे नेला कसा? यावरुन तर्कवितर्क लावल्या गेले. लगेच वेगाने सूत्रे हलली. महापौरांच्या कक्षात सर्वपक्षिय पदाधिकारी एकत्र आलेत. मंगळवारी आयुक्तांच्या कक्षात मालमत्ता करआकारणी संदर्भात ठराव पारित करण्याचे ठरविले असताना आयुक्तांनी महापौरांच्या स्वाक्षरीविना हा ठराव शासनाकडे नेल्याबाबत सदस्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे पक्षनेता बबलू शेखावत, स्थायी समिती सभापती विलास इंगोले, राष्ट्रवादी फ्रंटचे गटनेता अविनाश मार्डीकर, रिपाइंचे गटनेता प्रकाश बनसोड, माजी विरोधी पक्षनेता दिगंबर डहाके, दिनेश बूब, अजय गोंडाणे आदींनी एकत्र येऊन आयुक्तांच्या या अफलातून कारभावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. कालांतराने महापौर चरणजितकौर नंदा यांना देखील बोलाविण्यात आले. महापौर येताच ‘तुम्ही ठरावावर स्वाक्षरी केली काय?, आयुक्तांनी ठरावाबाबत तुम्हाला काही सांगितले काय?’ अशा वेगवेगळ्या प्रश्नांचा भडीमार करीत पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या कामकाजावर ताशेरे ओढले. मात्र, या ठरावाबाबत आपणास काही माहित नाही, असे महापौर म्हणाल्या. त्यामुळे पदाधिकाऱ्यांचा संताप वाढला. दरम्यान नगरसचिव तांबकेर यांनी शासनाला पाठविलेल्या ठरावावर महापौरांची स्वाक्षरी नसल्याचा मुद्दा स्पष्ट केला. आयुक्त मुंबईला स्मार्ट सिटीसंदर्भातील बैठकीला गेल्याची माहिती आहे. त्यांच्या सांगण्यावरून कोणत्याच ठरावावर स्वाक्षरी केली नाही. बुधवारी नव्याने ठराव करुन तो शासनाला पाठविला आहे.-चरणजितकौर नंदा,महापौर, महापालिकासर्वसाधारण सभेतील ठरावानुसार करासंदर्भात ठराव महापौरांनी मंजूर केला आहे. हाच ठराव प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. वेगळा ठराव शासनाने मान्य केल्यास तो नागरिकांवर अन्यायकारक ठरेल.-बबलू शेखावत,पक्षनेता, काँग्रेसविनापरवानगी, अतिरिक्त बांधकाम करणाऱ्यांवर कराचा बोझा पडू नये, यासाठी महापौरांच्या स्वाक्षरीने नवा ठराव शासनाला पाठविला आहे. हाच ठराव शासन मान्य करेल, अशी अपेक्षा आहे. .-अविनाश मार्डीकर,गटनेता, राष्ट्रवादी फ्रंटकर वाढीसंदर्भात शासनाकडे ठराव पाठविला नाही. सभागृहाच्या निर्णयाविरुद्ध जाण्याचा प्रश्नच नाही. सर्व सदस्यांना विश्वासात घेवूनच ठराव शासनाकडे पाठविला जाईल. -चंद्रकांत गुडेवार,आयुक्त, महापालिका