शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

परतवाड्यात ३० महिला घेणार अवयवदानाचा संकल्प, राज्यातील पहिलाच अभिनव प्रयोग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 21:28 IST

अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असले तरी त्यासाठी अजूनही नागरिक-नातेवाईक धजावत नाहीत. तथापि, परतवाड्यातील तब्बल ३० महिलांनी एकदिलाने अवयवदानाचा संकल्प केला आहे. परतवाडा येथे महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधून पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून बुधवारी त्या संकल्पपत्र भरून देतील.

- नरेंद्र जावरे

परतवाडा : अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असले तरी त्यासाठी अजूनही नागरिक-नातेवाईक धजावत नाहीत. तथापि, परतवाड्यातील तब्बल ३० महिलांनी एकदिलाने अवयवदानाचा संकल्प केला आहे. परतवाडा येथे महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधून पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून बुधवारी त्या संकल्पपत्र भरून देतील. राज्यात बहुधा पहिल्यांदा महिलांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात अवयवदान जागृती उपक्रम होत आहे. परतवाडा शहरात पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत २५ नागरिकांनी अवयवदानाचा  संकल्प केला आहे. बुधवारी महात्मा फुले जयंतीनिमित्त तब्बल ३० महिला संकल्प करणार आहेत. यामुळे परतवाडा शहरातील अवयवदात्यांची संख्या ५५ झाली आहे. मृत्यूनंतर आपल्या शरीरातील आवश्यक असे अवयव दुसºयाला दान देऊन त्याचे उर्वरित आयुष्य उज्ज्वल करण्याचे कार्य स्पृहणीय आहे. याबद्दल जनमानसात मोठ्या प्रमाणात जागृती व्हावी, यासाठी राज्यस्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. त्याला अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे सर्वाधिक प्रमाणात यश मिळत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. अमरावती येथे तीन रुग्णांचे उर्वरित आयुष्य अवयवदान करून उज्ज्वल करण्यात आले. त्यात एका किडनी प्रत्यारोपण केलेल्या रुग्णाचासुद्धा समावेश आहे.

महिला घेणार आज संकल्प अवयवदान करण्याचा संकल्प आतापर्यंत मोठ्या प्रमाणात युवकांनी आणि पुरुषांनीच घेतला. परंतु, पहिल्यांदा 30 महिला अवयवदान करण्याचा हा अभिनव संकल्प बुधवारी करणार आहेत. इतर महिला, युवकांमध्ये त्या जनजागृती करणार आहेत. 

पुनर्जीवन फाऊंडेशनच्या माध्यमातून बुधवारी ३० महिला अवयवदानाचा संकल्प करणार आहेत. यापूर्वी २५ जणांनी हा संकल्प केला आहे. डॉ. राजेश उभाड, अध्यक्ष, पुनर्जीवन फाउंडेशन, परतवाडा

टॅग्स :Organ donationअवयव दान