शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण पोलीस दलात खांदेपालट, ३० अधिकाऱ्यांच्या बदल्या

By प्रदीप भाकरे | Updated: July 6, 2023 13:14 IST

ठाणेदारांची अदलाबदल : नव्या चेहऱ्यांना संधी

अमरावती : पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी ५ जुलै रोजी घटकातील ३० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश पारित केले. यात अनेक ठाणेदारांची अदलाबदली करण्यात आली आहे.

यात नियंत्रण कक्षातील पोलीस निरिक्षक अजय अहिरकर यांना सायबर पोलीस ठाण्याची ठाणेदारकी देण्यात आली आहे. तर सतीश पाटील हे चांदूररेल्वेचे नवे ठाणेदार असतील. शिरखेड येथे कार्यरत सहायक पोलीस निरिक्षक हेमंत कडुकार यांची अनैतिक मानवी वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. तर चांदुररेल्वेचे ठाणेदार पंकज दाभाडे हे मंगरूळ दस्तगीरचे नवे ठाणदेार असतील. स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरिक्षक रामेश्वर धोंडगे यांच्याकडे तळेगाव दशासरची ठाणेदारकी देण्यात आली आहे. इश्वर वर्गे खोलापुरचे ठाणेदार झाले आहेत. तर सहायक पोलीस निरिक्षक सुलभा राऊत यांची अंजनगाव सुर्जी तर संघरक्षक भगत यांची वरूड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेतील सचिन पवार व सायबरमधील निर्मला भोई यांना जुन्याच ठिकाणी ठेवण्यात आले आहे. तर पोलीस उपनिरिक्षक प्रमोद काळे यांची चांदूरररेल्वेहून नांदगाव, गणेश सपकाळ तिवसा, तर संजय शिंदे व नितीन चुलपार यांना स्थानिक गुन्हे शाखेत कायम ठेवण्यात आले आहे.

पोलीस ठाण्यातील कालावधी पुर्ण झाल्याने बदली

पोलीस ठाण्यातील कालावधी पुर्ण झाल्याने सात सहायक पोलीस निरिक्षक व आठ पोलीस उपनिरिक्षकांची बदली करण्यात आली. सहायक पोलीस निरिक्षक शितल निमजे चिखलदराहून वरूड, नरेंद्र पेंदोर चांदूरबाजारहून परतवाडा, किरण औटे दर्यापुरातून सरमसपुरा ठाणेदार, सारिका राऊत वरूडहून चांदरबाजार, शुभांगी थोरात शेंदुरजनाघाटहून मोर्शी, प्रियंका चौधरी दत्तापुरातून चांदूररेल्वे व वरूडमध्ये कार्यरत वैभव महांगरे यांची बदली पैरवी शाखेत करण्यात आली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदलीAmravatiअमरावती