शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

रेल्वे गाङ्यांमध्ये आरक्षण ‘नो- रुम’

By admin | Updated: October 22, 2014 23:12 IST

नोकरदार, आप्तस्वकीय दिवाळी साजरी करण्यासाठी गावी पोहचले आहेत. मात्र दिवाळीचा उत्सव आटोपताच परतीचा प्रवासाला जाताना रेले गाड्यांमध्ये आरक्षण मिळणे कठीण झाले आहे.

अमरावती : नोकरदार, आप्तस्वकीय दिवाळी साजरी करण्यासाठी गावी पोहचले आहेत. मात्र दिवाळीचा उत्सव आटोपताच परतीचा प्रवासाला जाताना रेले गाड्यांमध्ये आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये आरक्षण ‘नो-रुम’ दाखवीत असल्याने दिवाळीसाठी आलेल्यांना परत कसे जावे, याची चिंता लागली आहे. त्यामुळे तत्काळचे आरक्षण मिळवण्यासाठी दलालांकडे आतापासून ‘फिल्डिंग’ लावत असल्याचे दिसून येते.अमरावती जिल्ह्यातील अनेक जण नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहतात. मात्र दरवर्षी दिवाळी साजरी करण्यासाठी न चुकता राहत्या घरी येतात. यावर्षीसुद्धा अनेक जण बाहेरगावाहून घरी पोहचले आहेत. दिवाळी साजरी केल्यानंतर परत जाताना रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळत नसल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. हल्ली रेल्वे आरक्षण खिडक्यांवर ‘नो- रुम’ चे फलक लावण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, बंगळूरू, दिल्ली, चैन्नई, अहमदाबाद, हैद्राबाद, बडोदा, कोलकाता, रायपूर, भिलाई, भोपाल, नाशीक आदी शहरांत परतीच्या प्रवासाला कशाने जावे हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी अनेकांनी कुटुंबासह घर गाठले आहे. अमरावती जिल्ह्यातून मुंबई, पुणे, अहमदाबाद, दिल्ली येथे नोकरी, व्यवसायानिमित्त मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. दिवाळी साजरी करण्यासाठी अनेक जण घरी पोहचले आहेत. मात्र ५ नोव्हेंबरपर्यंत रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळत नसल्याने दिवाळी साजरी करण्याऐवजी परतीच्या प्रवासाचे तिकीट आरक्षण मिळविण्याची लगबग सुरु झाली आहे. मुंबई, पुण्याचे आरक्षण नो- रुम दाखवत असल्याने किमान तात्काळचे रेल्वे आरक्षण कसे मिळेल, याचे नियोजन उत्सवासाठी आलेले प्रत्येक जण करीत असल्याचे आहे. मुंबई, पुणे जाण्यासाठी बऱ्याच रेल्वे गाड्या आहेत. मात्र एकाही रेल्वेचे आरक्षण उपलब्ध नाही, हे वास्तव आहे. वातानुकूलित, व्दितीय श्रेणी, तृतीय श्रेणीचे आरक्षण मिळत नसल्याचे रेल्वे आरक्षण खिडक्यांवर दिसून येते.अमरावती- मुंबई एक्सप्रेस, हावडा- कुर्ला एक्सप्रेस, हावडा- मुंबई मेल, नागपूर- पुणे स्पेशल ट्रेन, हावडा- पुणे, हटिया- पुणे, हावडा- पुणे, हटिया-पुणे, गोंदीया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस, हावडा- पुणे आझाद हिंद एक्सप्रेस, अमरावती- पुणे, नागपूर- पुणे गरीबरथ, नागपूर- पुणे, बिलासपूर- पुणे, नागपूर- मुंबई स्पेशल ट्रेन, विशाखापट्टनम् -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, हटिया- एलटीटी, हटिया- सीएसटी सुपर फास्ट, हावडा- मुंबई गितांजली, हावडा- मुंबई मेल, हावडा-सीएसटी स्पेशल ट्रेन, हावडा- कुर्ला शालीमार एक्सप्रेस, हावडा- एलटीटी सुपर डिलक्स, अमरावती - मुंबई एक्सप्रेस तसेच चैन्नई, कोलकात्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण उपलब्ध नसल्याची माहिती तिकीट बुकिंग करणाऱ्यांकडून मिळत आहे.२६ आॅक्टोबर रोजी अमरावती- मुंबई एक्सप्रेसचे ९०० वेटींग तर गोदिंया - मुंबई विदर्भ एक्सप्रेसचे ६०० वेटींग आरक्षण तिकीट निघाले आहे. त्यामुळे मुंबई, पुण्याकडे रेल्वेने जाणाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागेल, हे चित्र रेल्वे गाड्यांच्या आरक्षणाचे आहे.