शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकऱ्यांनी स्वत:च व्हावे संशोधक

By admin | Updated: January 31, 2017 00:32 IST

पगारी कर्मचारी संशोधक होऊ शकत नाहीत. त्यामुळे संशोधनासाठी शासनावर अवलंबून न राहता

दादाजी खोब्रागडे : ‘तांदूळ महोत्सवा’चे थाटात उद्घाटन अमरावती : पगारी कर्मचारी संशोधक होऊ शकत नाहीत. त्यामुळे संशोधनासाठी शासनावर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी स्वत:च स्वत:च्या शेतात संशोधन करावे आणि नवनवीन फायदेशीर वाणांची निर्मिती करावी. उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन ‘एचएमटी’ तांदळाच्या वाणाचे जनक, कृषीभूषण दादाजी खोब्रागडे यांनी केले. फ्रेंड्स आॅफ फार्मर्स, कृषी समृद्धी शेतकी उत्पादन कंपनी व श्रमजीवी उत्पादक कंपनीच्या संयुक्त विद्यमाने नागपूर, भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांद्वारे उत्पादित तांदळाची ग्राहकांना थेट विक्री करण्यासाठी हा महोत्सवाचे आयोजित केला आहे. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव धनंजय धवड, शेतीतज्ज्ञ अरविंद नळकांडे, फ्रेंड्स आॅफ फार्मर्सच्या पौर्णिमा सवाई, ज्योत्स्ना ठाकरे आदींची उपस्थिती होती. दादाजी खोब्रागडे पुढे म्हणाले, शेतकरी आणि ग्राहकांमध्ये असलेल्या व्यापाऱ्यांच्या साखळीतून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यामध्ये ग्राहकांची फसवणूक तर होतेच पण शेतकरी देखील नाडवला जातो. अन्नधान्यामध्ये होणारी भेसळ हा त्यातलाच एक प्रकार आहे. शेतकरी धान्यात कधीच भेसळ करीत नाही तर व्यापारी भेसळ करतात. त्यामुळेच ग्राहकांनीही शेतकऱ्यांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी त्यांच्याकडून अन्नधान्य, भाजीपाला खरेदी करून त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. कार्यक्रमाला फ्रेंड्स आॅफ फार्मर्सच्या रंजना झोंबाडे, ज्योत्सना ठाकरे, स्मिता पाटील, श्वेता खापेकर, पौर्णिमा सवई, रेखा जिचकार, माया पुसदेकर आदी उपस्थित होत्या. प्रास्ताविक कृषी समृद्धी प्रकल्पाचे रवि पाटील यांनी केले. महिलांचाच पुढाकार ४‘फ्रेंड्स आॅफ फार्मर्स’ हा महिला शेतकऱ्यांचाच समूह असून या समूहातील महिलांनी या आगळ्या-वेगळ्या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना शेतमालाच्या थेट विक्रीसाठी मदत करण्याच्या उद्देशाने महिलांनीच प्रथम पुढाकार घेतला असून, हेच या तांदूळ महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.