शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

5 हजार वर्षे जुन्या सिंधू सभ्यतेवर संशोधन, जर्नल ऑफ आर्कियोलॉजिकल सायन्स रिपोर्टमध्ये महाराष्ट्रीयांचे संशोधन प्रकाशित

By गणेश वासनिक | Updated: March 19, 2024 20:52 IST

मानवी संस्कृतीची उत्पत्ती आणि प्रसारावर भर

अमरावती: मानवी संस्कृतीची उत्पत्ती आणि प्रसार समजून घेण्यासाठी सिंधू खोरे हे सर्वात जुन्या व अतिशय महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे. शिकार आणि अन्न गोळा करण्याच्या टप्प्यावर हजारो वर्षे घालविल्यानंतर मनुष्य केवळ १० हजार वर्षांपूर्वीच शेतीप्रधान झाला. भारतीय उपखंडाच्या वायव्येस सिंधू सभ्यतेची ठिकाणे विस्तीर्ण आहेत. अलीकडच्या काळात हरियाणा राज्यातील भिराना हे गाव एक महत्त्वाचे सिंधू सभ्यतेचे अभ्यास केंद्र म्हणून उद्यास आले. या ठिकाणी सात हजार वर्षांपूर्वीची हडप्पा सभ्यतापूर्व वसाहत म्हणून वर्गीकृत आहे.

अलीकडेच महाराष्ट्रातील तीन प्राध्यापकांनी एल्सेवियर प्रकाशनाच्या ‘जर्नल ऑफ आर्कियोलॉजिकल सायन्सः रिपोर्ट’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये पाच हजार वर्षे जुन्या सिंधू खोऱ्याशी संबंधित संशोधन प्रकाशित केले. या संशोधनात अमरावती येथील शासकीय ज्ञान-विज्ञान संस्थेचे सहयोगी प्राध्यापक डॉ.मुमताज बेग सहभागी आहेत. ते सध्या कॅनडामध्ये संशोधन करीत आहेत. तथा यवतमाळ येथील अमलोकचंद महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ.अश्विन अतकुलवार, डेक्कन कॉलेज ऑफ आर्कियोलॉजी (पुणे) येथील प्रा.डॉ.आरती देशपांडे-मुखर्जी यांच्यासोबत सहकार्य करून संशोधन केले.

प्रा.डॉ.आरती देशपांडे-मुखर्जी यांनी भिराना स्थळावरील विविध ठिकाणांहून प्राण्यांची हाडे उत्खनन करून प्राप्त केली. हाडांचा आकारशास्त्रीय आधारित अभ्यास केल्यानंतर लॅबोरेटरी ऑफ मॉलीकूलर ॲन्ड कॉन्जर्वेशन जेनेटिक, अमरावती शासकीय ज्ञान विज्ञान संस्थांच्या प्रयोगशाळेत डीएनए आधारित अभ्यासासाठी हाडे पाठविण्यात आली होती. पुरातत्त्वीय स्थळाच्या उत्खननादरम्यान भेडसावणाऱ्या प्रमुख समस्यांपैकी एक म्हणजे हाडांच्या छोट्या तुकड्यांवरून प्राणी ओळखणे. डॉ.बेग आणि डॉ.अतकुलवार यांनी तीन हजार वर्षांहून अधिक जुन्या गुरांचा हाडांमधून डीएनए मिळविण्यासाठी आणि त्यांचे वर्गीकरण करण्यासाठी डीएनए मार्कर व नवीन जनुकीय प्रोटोकॉल तयार केले. हजारो वर्षांच्या हाडांमधून डीएनए काढण्यात जगातील फार कमीच संशोधक यशस्वी झाले आहेत.शोधनिबंधांच्या प्रकाशनानंतर जगाच्या विविध भागांतील संशोधकांनी या शोधनिबंधाच्या प्रतींची मागणी केली आहे. विज्ञानाच्या अभ्यासाला खूप संयम आणि प्रयत्नांची आवश्यकता आहे. हा शोधनिबंध प्रकाशित करण्यासाठी थेट ६ वर्षांचा कालावधी लागला.- डॉ.मुमताज बेग, संशोधन चमू प्रमुख

टॅग्स :Amravatiअमरावती