निर्णय हेल्मेट सक्तीचा : अंमलबजावणी सुरूअमरावती : पुणे, औरंगाबाद पाठोपाठ राज्याच्या उपराजधानीत हेल्मेट अनिवार्य करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे राज्यातील उर्वरित भागांत केव्हा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुरेशा जनजागृतीनंतर राज्यात सर्वदूर हेल्मेट अनिवार्य केले जाईल, असे संकेत यंत्रणेने दिले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील बहुतांश लोकप्रतिनिधींनी हेल्मेट अनिवार्य या उच्च न्यायालयासह राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र सक्ती करण्यापूर्वी नागरिकांमध्ये हेल्मेटबाबत पुरेशी जनजागृती व्हावी, असा सूरही लोकप्रतिनिधींमधूून उमटला आहे. दुचाकीस्वारांची सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून उच्च न्यायालयाने दुचाकीचालकासह त्याच्या मागे बसणाऱ्यांसाठी हेल्मेट अनिवार्य केले. तोच धागा पकडून परिवहन मंत्र्यांनी त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाठोपाठ परिवहन आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रक काढून हेल्मेट सक्तीचा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे संपूर्ण राज्यात हेल्मेट अनिवार्य करण्याची अंमलबजावणी सुरू झाली व हे वादळ घोंगावू लागले. पुण्यात विरोध होत असताना अमरावतीकर लोकप्रतिनिधींनी मात्र सकारात्मक पवित्रा घेतला आहे, हे उल्लेखनीय.
लोकप्रतिनिधी सकारात्मक : सुरक्षा महत्त्वाचीच!
By admin | Updated: February 10, 2016 00:23 IST