शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
2
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
3
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
4
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
5
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
6
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
7
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
8
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
9
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
10
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
11
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
12
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
13
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
14
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
15
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
16
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
17
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
18
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
19
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

मनीष ठाकरेंविरूद्ध गुन्हा नोंदवा, अन्यथा न्यायालयात दाद मागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:38 IST

आंबेडकरी चळवळीतील वरिष्ठ कार्यकर्ते सुदाम बोरकर यांच्यासह भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना जातीभेदावरून धक्काबुक्की करणारे गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा, अन्यथा आम्ही न्यायालयात दाद मागू, अशी मागणी केल्याची माहिती सोमवारी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देभीम आर्मीची मागणी : जातीभेद करीत धक्काबुक्की केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आंबेडकरी चळवळीतील वरिष्ठ कार्यकर्ते सुदाम बोरकर यांच्यासह भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना जातीभेदावरून धक्काबुक्की करणारे गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा, अन्यथा आम्ही न्यायालयात दाद मागू, अशी मागणी केल्याची माहिती सोमवारी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी पत्रपरिषदेत दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आढावा बैठक घेतली. दरम्यान अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी विविध समस्या व मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले. त्यावेळी भीम आर्मीचे कार्यकर्तेही १५४ पोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्तीच्या मुद्दाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी जाणार होते. दरम्यान आरटीओ मार्गावरील नियोजन भवनाच्या प्रवेशद्वारावर भीम आर्मी भारत एकता मिशनचे प्रदेश सचिव मनीष साठे, अमरावती जिल्हाप्रमुख सुदाम बोरकर, शहरप्रमुख बंटी रामटेके, शहर उपप्रमुख प्रवीण बनसोड व हेमंत कोडापे हे पाच कार्यकर्ते पोहोचले. त्यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांना निवेदन देण्यासंदर्भात विनंती केली. बैठक झाल्यानंतर भेट होईल, असे सातव यांनी सांगितल्यानंतर भीम आर्मीचे कार्यकर्ते परत बाहेर गेले. परत काही वेळानंतर सर्व कार्यकर्ते प्रवेशद्वाराजवळ जमले आणि तेथे उपस्थित पोलिसांना आत जाण्यासाठी परवानगी मागू लागले. मात्र, पोलिसांना त्यांना आत जाऊ दिले नाही. दरम्यान फे्रजरपुराचे ठाणेदार आसाराम चोरमले यांच्याकडे कार्यकर्त्यांनी विनंती केली. मात्र, वरिष्ठ अधिकाºयांनी मनाई केल्याचे चोरमलेंनी कार्यकर्त्यांना सांगितले. दरम्यान कार्यकर्त्यांना डिटेन व्हायला निघाले असता, तेवढ्यातच गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे प्रवेशद्वाराजवळ आले आणि त्यांनी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमध्ये टाकण्याचे फर्मान सुनावले. याबाबत सुदाम बोरकर यांनी ठाणेदारांना जाब विचारला असता, त्यांनी दुप्पटे टाकले तर नेता झाले का, तुमच्या बापाचे शहर आहे का, साल्यांनो सरळ वागा, नाही तर आम्हाला सरळ करता येते, असे बोलून सुदाम बोरकर यांचा हात पकडून धक्काबुक्की केल्याचे भीम आर्मीचे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांना अनेक राजकीय नेते भेटले. मात्र, आम्हालाच भेटू का दिले गेले नाही. ठाणेदारांनी आमच्याशी भेदभाव केला. मागासवर्गीय समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. शिवीगाळ व अभद्र भाषेचा वापर केल्याचा आरोप भीम आर्मीने पत्रपरिषदेतून केला आहे. ठाणेदारांची अशी वागणूक आमच्या भावना दुखावणारी असून, ठाणेदार मनीष ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा, यासंदर्भात पोलीस आयुक्तांकडेसुद्धा तक्रार करू, अशी माहिती भीम आर्मीचे सुदाम बोरकर यांनी दिली.तक्रार घेतली नाहीभीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना 'डिटेन' केल्यानंतर त्यांनीही गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्याविरुद्ध ठाण्यात लेखी तक्रार नोंदविली. त्याची पोच भीम आर्मीला मिळाली आहे. मात्र, तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे सुदाम बोरकर यांनी सांगितले.