लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : दोन महिन्यांनंतर पुन्हा एकदा वरूड तालुक्यात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. नजीकच्या पुसला परिसरात अनेक शेतकºयांनी वाघ पाहिल्याचे सांगितले, तर उराडमध्ये एक कालवड फस्त केली. वनविभागाने केलेल्या तपासणीत उराड व लोहद्रा गावात वाघाचे ठसे मिळाले आहेत.आक्टोबर महिन्यात वरूड तालुक्यातील शहापूर पुनर्वसन परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली होती. येथे वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा महिनाभरापूर्वी बळी गेला. वनविभागाने ‘आॅपरेशन टायगर’ राबविले. वाघाने नागपूर जिल्ह्यात प्रवेश केल्यावरही अनेक दिवस वाघाची दहशत कायम होती. आता वाघाची भीती कमी झाल्यावर पुन्हा २९ डिसेंबर रोजी उराड शिवारातील राजू वायकुळ यांच्या शेतात मजुरांना वाघ दिसला. ही माहिती वनविभागाला देण्यात आल्याने त्यांनी तपासणी केल्यावर वाघाचे ठसे आढळून आल्याने पुष्टी झाली. यानंतर अनेक शेतकरी व मजूर गावात परतले. उराडमध्ये एका कालवडीचा फडशा पाडल्याची माहिती शेतकºयांनी दिली आहे.पुसला, उराड, लोहद्रा परिसरात वाघाचा शोध सुरू आहे. वाघाच्या पायांचे ठसे आढळून आले. नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.- दादाराव काळे, वनाधिकारीकाही महिन्यांपूर्वी वाघाच्या दहशतीने शेतकरी त्रस्त झाले असताना, शेतीचे नुकसान झाले. पुन्हा वाघाचे आगमन झाल्याने शेतकरी, शेतमजूरदहशतीत आहे.- विजय श्रीराव,नागरिक
पुन्हा वाघाचे दर्शन, कालवड फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 01:08 IST
दोन महिन्यांनंतर पुन्हा एकदा वरूड तालुक्यात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. नजीकच्या पुसला परिसरात अनेक शेतकºयांनी वाघ पाहिल्याचे सांगितले, तर उराडमध्ये एक कालवड फस्त केली. वनविभागाने केलेल्या तपासणीत उराड व लोहद्रा गावात वाघाचे ठसे मिळाले आहेत.
पुन्हा वाघाचे दर्शन, कालवड फस्त
ठळक मुद्देपायाचे ठसे आढळले : पुसल्यात शेतकऱ्यांना दाखविली झलक