शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

खुनाचा कट उधळला; दोन पीस्तूल, पाच काडतुसे, १४ तलवारी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 01:21 IST

रेती व्यवसायातील वैमनस्यातून आखलेला खुनाचा कट पोलिसांनी उधळून लावला. गाडगेनगर व नागपुरी गेट पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई शुक्रवारी मध्यरात्री लालखडी रोडवरील एमपी ट्रान्सपोर्टनगर येथे केली. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, ११ आरोपी पसार झाले आहेत.

ठळक मुद्देचार आरोपींना अटक, ११ फरार । गाडगेनगर, नागपुरी गेट पोलिसांची संयुक्त धडाकेबाज कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेती व्यवसायातील वैमनस्यातून आखलेला खुनाचा कट पोलिसांनी उधळून लावला. गाडगेनगर व नागपुरी गेट पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई शुक्रवारी मध्यरात्री लालखडी रोडवरील एमपी ट्रान्सपोर्टनगर येथे केली. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, ११ आरोपी पसार झाले आहेत. गाडगेनगर पोलिसांनी अटकेतील आरोपींकडून दोन देशी पीस्तुलांसह पाच जिवंत काडतुसे १४ तलवारी, चार मोबाईल, एक चारचाकी वाहन व नऊ मोटरसायकली जप्त केल्या आहेत. अमरावती शहरात मोठे गँगवॉर टळल्याचा दावा पोलिसांनी केला.गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात या प्रकरणात १५ आरोपींविरुद्ध कलम ३/२५, ४/२५ आर्म्सअ‍ॅक्ट, भादंविचे कलम १०९ व १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी मोहम्मद सादिक शेख रज्जाक (३५, रा. हबिबनगर नं. २), नैयर अली बेग मुक्कदर अली बेग (३५, रा. गवळीपुरा), वसीम खान माले खान (३२, रा. जहीदनगर), अबिद खान सुभान खान (२५, रा. लालखडी) यांना अटक केली. २१ जून रोजीच्या रात्री ११ वाजता मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गाडगेनगर व नागपुरी गेट पोलिसांच्या पथकांनी एमपी राजस्थान ट्रान्सपोर्ट हाऊससमोर सापळा रचला. तेथील एमएच २० बीवाय ९६९८ क्रमांकाच्या चारचाकी वाहनांजवळ पोलीस गेले असता, त्यात बसलेले दहा ते बारा जण पळून गेले, तर चार जण पोलिसांच्या हाती लागले.पोलिसांना त्या वाहनात १४ तलवारी मिळून आल्या. सोबत आरोपींची अंगझडती दोन देशी पीस्तुलांसह पाच जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी आरोपींजवळून चार मोबाइल जप्त केले. चारचाकी वाहनासह घटनास्थळाहून पसार आरोपींच्या नऊ मोटरसायकली जप्त केल्या आहेत. पोलिसांनी एकुण १५ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा शस्त्रसाठा कुणाचा गेम करण्यासाठी होता, याची शहरात चर्चा आहे.सीपींकडून पोलिसांना रिवार्डपोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, उपायुक्त यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात गाडगेनगर ठाणेदार मनीष ठाकरे, नागपुरी गेटचे ठाणेदार अर्जुन ठोसरे, गाडगेनगरचे उपनिरीक्षक गोकुल ठाकुर, डीबीचे शेखर गेडाम, विशाल वाकंपांजर, सतीश देशमुख, भारत वानखडे, अनिल तायवाडे, उमेश उईके, प्रशांत वानखडे व नागपुरी गेटचे पीएसआय पुरुषोत्तम ठाकरे, शिपाई प्रमोद गुडदे, विनोद इंगळे, अकील खान, चालक पवार, बारबुद्धे, चार्ली इप्पर, कोहली यांनी कारवाई केली. पोलीस आयुक्तांनी गाडगेनगर ठाण्यात भेट देऊन ठाणेदार ठाकरे यांना तीन हजार व उर्वरित प्रत्येकाला दोन हजारांचा रिवार्ड दिला.रेती तस्करीतून हत्येचा कटशहरातील रेती तस्करांमधील व्यावसायिक स्पर्धेतून काही गुंड प्रवृत्तीच्या इसमांनी एका व्यावसायिकाच्या हत्येचा कट रचला होता. हत्येसाठी पूर्वतयारी म्हणून हा मोठा शस्त्रसाठा गोळा केला होता. यादरम्यान पोलिसांनी हत्येचा कट उधळून लावला, अन्यथा मोठी घटना घडली असती.पसार आरोपींमध्ये राजकीय पदाधिकारीपोलिसांनी चार आरोपींना अटक करून त्यांची चौकशी केली असता, त्याने त्यांच्या अन्य साथीदारांची नावे सांगितली. त्यामध्ये एका राजकीय पदाधिकाऱ्याचे नाव पुढे आले आहे. महापालिकेचा तो नगरसेवक असून, कोणाचा तरी गेम करण्यासाठी हा शस्त्रसाठा दिल्याचे आरोपींनी सांगितले. पोलिसांनी जप्त केलेल्या एमएच २० बीवाय ९६९८ क्रमांकाच्या वाहनाच्या समोरील काचावर ‘हिवाळी अधिवेशन २०१७’ हे स्टिकर होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी