शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अनियंत्रित वाहतुकीवर उपाययोजनांचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2016 23:58 IST

अपूर्वा देऊळगांवकर या तरुणीच्या अपघाती मृत्युनंतर पोलीस प्रशासनासह अन्य विभागांनाही खडबडून जाग आली आहे.

सर्वेक्षणाला प्रारंभ : ट्रॅफिक स्टेट्स रिपोर्ट येणार अमरावती : अपूर्वा देऊळगांवकर या तरुणीच्या अपघाती मृत्युनंतर पोलीस प्रशासनासह अन्य विभागांनाही खडबडून जाग आली आहे. शहरातील वाहतुकीचा अभ्यास करुन उपाययोजना सुचविण्याच्या हेतुने मंगळवारपासून सर्वेक्षणाला सुरुवात झाली. पोलीस उपायुक्त नितिन पवार यांच्या नेतृत्वात या सर्व्हेक्षणाला सुरुवात झाली. त्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, एसटी आणि महापालिकेचे अधिकारी सहभागी झालेत. समन्वय समितीच्या सदस्यांसह नगरसेवकांनीही वाहतुकीच्या नियमनासंदर्भात सूचना दिल्यात. पोलीस उपायुक्त नितिन पवार यांनी प्रथम शहर वाहतूक शाखेच्या इर्विन चौक कार्यालयात नगरसेवक व समन्वयक समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. यावेळी महापालिका अतिक्रमण विभाग पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे, सहप्रादेशिक परिवहन अधिकारी एम.बी.नेवासकर यांच्यासह एसटी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सहभागी झाले. यात उपस्थितांनी वाहतुकीसंदर्भात चर्चा केली. इर्विन चौकातून सर्वेक्षणाला सुरूवात इर्विन चौकातून सर्वेक्षणाला सुरूवात करण्यात आली. इर्विन चौकात उभी राहणारी वाहने कुठे वळविता येतील, आॅटोरिक्षा पार्किंग, अ‍ॅम्ब्युलन्स पार्किंगबाबतही चर्चा झाली. नगरसेवक दिनेश बुब, मिलिद बांबल, राजू मसराम, संजय मालपे यांनी पोलीस उपायुक्त पवार यांना सूचना केल्यात. वाहने हटविली डीसीपी नीतीन पवार हे सर्वेक्षणासाठी अन्य अधिकारी व नागरिकांसह बाहेर पडल्याचे कळताच कॉटन मार्केट संकुलाजवळ राजरोसपणे उभी राहणारी काही वाहने तात्पुरती हटविण्यात आली. पवार आणि चमू गेल्यानंतर या भागातील अतिक्रमण जैसे थे झाले. (प्रतिनिधी)मालवीय चौकातील अतिक्रमणाने अवाक् मालवीय चौकातील गॅरेजसमोर लागलेले अतिक्रमण पाडून पवार व अन्य अधिकारी अवाक झाले. इर्विन ते चित्राचौकापर्यंत रस्त्यावर पार्किंग व अतिक्रमण पवार यांच्या नजरेतून सुटू शकले नाही. कॉटन मार्केट संकुलासमोर लागणारी चारचाकी वाहने येथेच का लगतात, असा सवालही यावेळी उपस्थित झाला.पार्किंग, नो-पार्किंग आणि हॉकर्स झोनची पाहणी ट्रॅफिक स्टेटस रिपोर्टसाठी पार्किंग, नो-पार्किंग आणि प्रस्तावित हॉकर्स झोनची पाहणी करण्यात आली. हॉकर्स झोन कार्यान्वित झाल्यास फेरीवाल्यांना अधिकृत जागा मिळेल व अतिक्रमणातून शहराची मुक्तता होईल, असे निरीक्षणही सर्वेक्षणादरम्यान निरीक्षण नोंदविण्यात आले. प्रभारी एसीपी बळीराम डाखोरे, वाहतूक निरीक्षक प्रमेश आत्राम, निलिमा आरज, परिवहन अधिकारी रवींद्र अनवाने, विभागीय वाहतूक अधिकारी ए.बी. सिया, साबांविचे अतिरिक्त अभियंता आर. आर. तिवारी, पि.यू. उमाळे, महापालिका सहाय्यक अभियंता एस.एम. टोपरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.