शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मागणीच्या अर्धेच मिळतात ‘रेमडेसिविर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 05:01 IST

कोरोना मार्च २०२० पासून सुरू आहे. कोविड रुग्णांवर नेमका कोणता उपचार करावा, याचे निदान डॉक्टरांना देखील लागत नाही. मात्र, कोरोना रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन दिले की बरे होतात, असा सुरात सूर मिसळला. आता अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिविर  इंजेक्शन मिळविण्यासाठी नातेवाईकांची तुडुंब गर्दी होत आहे. ग्रामीण असो वा शहरी भाग असा दोन्ही क्षेत्रात हल्ली ‘रेमडेसिविर’ प्राप्त करण्यासाठी धावाधाव सुरू आहे.

ठळक मुद्देरुग्णांच्या नातेवाइकांची फरफट, पीडीएमसीला १० दिवसांत ३८०० व्हायल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना रुग्णांच्या उपचारात महत्त्वाचे असलेल्या ‘रेमडेसिविर’ या इंजेक्शनची मागणी कमालीची वाढली आहे. रेमडेसिविर मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांच्या रांगा लागत आहे. मात्र, मागणी अधिक, पुरवठा कमी अशी जिल्हा आरोग्य यंत्रणेची स्थिती आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात गत पाच महिन्यांपूर्वी आलेला रेमडेसिविर’ इंजेक्शनचा साठा  आतापर्यंत पुरविला जात आहे.कोरोना मार्च २०२० पासून सुरू आहे. कोविड रुग्णांवर नेमका कोणता उपचार करावा, याचे निदान डॉक्टरांना देखील लागत नाही. मात्र, कोरोना रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन दिले की बरे होतात, असा सुरात सूर मिसळला. आता अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिविर  इंजेक्शन मिळविण्यासाठी नातेवाईकांची तुडुंब गर्दी होत आहे. ग्रामीण असो वा शहरी भाग असा दोन्ही क्षेत्रात हल्ली ‘रेमडेसिविर’ प्राप्त करण्यासाठी धावाधाव सुरू आहे. परिणामी शासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण येत असल्याचे चित्र आहे. येथील डॉ, पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात रेमडेसिविरसाठी सकाळी ७ वाजतापासून रुग्णांच्या नातेवाईकांच्या रांगा लागत आहे. दिवसभर उन्हा-तान्हात उभे राहण्यानंतर महत्प्रयासाने इंजेक्शन प्राप्त केल्या जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नियंत्रणात शासकीय उपजिल्हा रूग्णालय, सुपर स्पेशालिटी व पीडीएमसीच्या कोविड रुग्णालयात रेमडेसिविर पाठिवले जातात. डॉक्टरांची मागणी आणि रुग्ण संख्येच्या तुलनेत इंजेक्शन दिले जात असल्याची माहती आहे. मात्र, कोरोना रुग्णांना वेळीच योग्य उपचार व्हावा, यासाठी रेमडेसिविर उपलब्ध करावे, अशी मागणी आहे.

कोरोना रुग्णांवर उपचाराठी ‘रेमडेसिविर’ची मागणी वाढली आहे. दररोज १५० ते २०० असे व्हायल मिळत असून, रुग्णांचे नातेवाईक ३५० ते ४०० पर्यंत नोंदणी करतात. मात्र, उपलब्धतेनुसार ‘रेमडेसिविर’ देण्यात येत आहे. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच हे इंजेक्शन दिले जाते.- अनिल देशमुख अधिष्ठाता, पीडीएमसी.

कोरोना संसर्गाचा वेग लक्षात घेता रूग्णांना वेळीच उपचार मिळणे काळाची गरज आहे. अनेक कोरोना बाधित रुग्णांना ‘रेमडेसिविर’ मिळत नाही. खासगी रुग्णालयात चढ्या दराने ते विकले जात आहे. मात्र, शासकीय रुग्णालयात ‘रेमडेसिविर’चा तुटवडा होत आहे. हे चित्र बदलले पाहिजे.- प्रमाेद महल्ले नागरिक, राधानगर

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस