शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

वरुडच्या दिगंबर जैन मंदिरात आजपासून धार्मिक कार्यक्रम

By admin | Updated: May 24, 2016 00:42 IST

तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ३१ फूट उंचीचे समवशरण रचना आणि समवशरण विधान परमपूज्य तपस्वी सम्राट आचार्य श्री १०८ सुवीरसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत...

भक्तीभाव : ३१ फूट उंचीचे समवशरण रचना, विधानवरूड : तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ३१ फूट उंचीचे समवशरण रचना आणि समवशरण विधान परमपूज्य तपस्वी सम्राट आचार्य श्री १०८ सुवीरसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत श्री१००८ चंद्रप्रभू दिंगंबर जैन मंदिर ट्रस्टच्यावतीने २४ ते २९ मे पर्यंत नगरपरिषद शाळेच्या मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये विधानाचार्य पं.संजय सरस चिंचोली, सहप्रतिष्ठाचार्य पं.संदीप जैन यांची उपस्थिती लाभणार आहे.समवशरण रचना आणि समवशरण विधान कार्यक्रमात २४ ला पहाटे ६ ते सकाळी ९ वाजेपर्यंत मंदिरात गुरुआज्ञा, जलमंडल पूजन, जलयात्रा रॅली, मंडप उद्घाटन, ध्वजारोहण विधी, अभिषेक, नित्यपूजन दुपारी सकलीकरण, इंन्द मंडल प्रतिष्ठा, कलश स्थापना, अखंड दीप प्रज्ज्वलन विधान शुभारंभ सायंकाळी आनंद यात्रा, शास्त्रसभा, संगीतमय आरती तसेच सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. २५ ते २८ पर्यंत मंगलाष्टके, जाप्यानुष्ठान श्रीजींचे पंचामृत अभिषेक, शान्तीधारा, नित्यपूजन, दिव्य ध्वनी, २९ ला सकाळी नियमित विधी विधानाचा कार्यक्रम आणि दुपारी मॉ जिनवाणी पूजन, गुरुपूजन, लघु नाटिका, मुनीश्रीचे प्रवचन आणि सन्मान कार्यक्रम, यानंतर रथयात्रा उत्सव आणि कार्यक्रमाची सांगता होणार आहे.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खा. रामदास तडस, पालकमंत्री ना.प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री ना. रणजित पाटील, आमदार अनिल बोंडे, वसुधा बोंडे, माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख, माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, बैतूलचे पोलीस अधीक्षक राजकेश जैन, उपजिल्हाधिकारी पंकजकुमार जैन बैतूल, उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, मोर्शीचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, नगराध्यक्ष रवींद्र थोरात, ठाणेदार अर्जुन ठोसरे, बेनोडाचे ठाणेदार एस.आर. पाटील, न.प.उपाध्यक्ष लिलाधर बेलसरे, अखिल भारतीय जैन संघटना जिल्हाध्यक्ष चंदू गुलवाडे, जागृत नवयुवक शिक्षण संस्थेचे सचिव के.डी.वैद्य तसेच नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. वरुड तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदा ३१ फूट उंचीचे समवशरण रचना आणि समवशरण विधान परमपूज्य तपस्वी सम्राट आचार्य श्री १०८ सुवीरसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत श्री१००८ चंद्रप्रभू दिंगंबर जैन मंदिर ट्रस्टच्यावतीने २४ ते २९ मे पर्यंत नगरपरिषद शाळेच्या मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजन समितीचे मुख्य संयोजक पदमकुमार मानेकर, हिरासाव गव्हाणे, अध्यक्ष अरविंद भागवतकर, उपाध्यक्ष नितीन मोरस्कर, राजेंद्र थेरे, पंजाब पोहरे, प्रमोद मानेकर, कोषाध्यक्ष संजय विटाळकर, भूषण महात्मे, सचिव चंद्रकांत थेरे, अविनाश महात्मे, राजाभाऊ मांडवगडे, सहसचिव रवींद्र मांडवगडे, राहूल महात्मे, स्वागताध्यक्ष सुधाकर विटाळकर, जीवन नखाते. तसेच शीतल मेंढे, रोहन महात्मे, देवेंद्र नखाते, जीवराज मांडवगडे, अतुल फुलउंबरकर, प्रकाश आगरकर, विनय शहा, जितेन शहा, सुनील जैन, यशपाल जैन, तसेच महिला मंडळ परिश्रम घेत आहे. कार्यक्रमाच्या आयोजनाची जय्यत तयारी सुरु आहे. यासाठी आयोजन समित्यांचे गठन करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)