शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

कोरोना काळात शेतकरी आत्महत्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:10 IST

गजानन मोहोड अमरावती : कोरोना संकट काळातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. अस्मानी व सुल्तानी संकटामुळे पश्चिम विदर्भात यंदा ...

गजानन मोहोड

अमरावती : कोरोना संकट काळातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. अस्मानी व सुल्तानी संकटामुळे पश्चिम विदर्भात यंदा जूनअखेर ४६१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. मागील वर्षी याच कालावधीत ५०० शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. दर दोन दिवसांत पाच तर दर नऊ तासांत एक शेतकरी आत्महत्या होत आहे.

कर्ज, नापिकी, नैसर्गीक आपत्ती, दुष्काळ यामध्ये वऱ्हाडातील शेतकरी अडकला आहे. यामध्ये मुला-मुलींचे शिक्षण, लग्न व घरसंसार कसा करावा, या विवंचनेत शेतकऱ्यांच्या संघर्षात नैराश्य मात करीत आहेत. नापिकीच्या दृष्टचक्रात खासगी सावकारांचे कर्ज वाढत आहे. शेतीमध्ये उत्पादन खर्चही पदरी पडत नसल्याने पोशिंद्याचा धीर खचून तो मृत्यूचा घोट घेत असल्याचे चित्र दुदैवी आहे. कोरोना काळात यामध्ये अंशत: कमी आलेली आहे. अशास्थितीत जिल्हा समितीची सहा-सहा महिने बैठक होत नसल्याने प्रशासनाची याविषयी अनास्था दिसून येत आहे.

राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात होत आहे. शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यांमध्ये शासनाद्वारा अनेक योजना प्राधान्यद्वारा राबविण्यात येतात. मात्र, खऱ्या व गरजू शेतकऱ्यांपर्यत योजनेचा लाभ पोहोचत नाही. शासन व प्रशासनाद्वारा शेतकरी आत्महत्या हा विषयच मुळात गंभीरतेने घेत नसल्यामुळे

बॉक्स

सन २००१ पासून १६,८४८ शेतकरी आत्महत्या

विभागामध्ये १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद महसूल विभागाद्वारे घेण्यात येते. त्यानुसार आतापर्यंत १६ हजार ८४८ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये ७,५६५ प्रकरणात वारसांना शासन मदत देण्यात आलेली आहे. ८,९७३ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आलेली आहे. याशिवाय ३९० प्रकरणे अद्यापही चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

बॉक्स

शेतकरी आत्महत्यांची स्थिती (जूनअखेर)

महिना २०१९ २०२० २०२१

जानेवारी ७७ ८३ ७८

फेब्रुवारी ७३ ९७ ७२

मार्च ८२ ५९ ८९

एप्रिल ७१ ५१ ६४

मे ९१ ११६ ७५

जून ८१ ९४ ८२

एकूण ४७५ ५०० ४६०