अचलपूर : अमित बटाऊवाले खून प्रकरणातील तीन आरोपींचा जामीन सोमवारी येथील जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश हेडाऊ यांनी फेटाळला. त्यामुळे उर्वरित आरोपींना जामीन मिळण्याची आशा धुसर झाली आहे. रेती तस्करीतून बारुद गँगच्या सदस्यांनी अमित बटाउवाले या युवकाची भरदिवसा रस्त्यात हत्या केली, तर त्यांचे वडील मोहन यांना गंभीर जखमी केले होते. ही घटना ११ आॅगस्ट रोजी अचलपूर येथे घडली होती. या खून खटल्यात पोलिसांनी १५ आरोपींना अटक केली होती. ते सर्व अमरावती जिल्हा कारागृहात आहे.सदर खून खटल्यातील आरोपी मो. शारीक अब्दुल मो. मतीन मो. जाफर, मो. अश्फाक मो. जाफर या तीन जणांना पोलिसांनी तपासात आरोपी केले होते. यांनी अचलपूर सत्र न्यायालयात जामिनसाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला. आरोपीतर्फे मिर्झा (अमरावती) तर सरकारतर्फे अॅड. नवले यांनी युक्तिवाद केला. (प्रतिनिधी)
बटाऊवाले हत्याकांडातील तिघांचा जामीन फेटाळला
By admin | Updated: December 22, 2015 00:17 IST