शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
2
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
3
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
4
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
5
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
6
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
7
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
8
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
9
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
10
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
11
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
12
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
13
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
14
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
16
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
17
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
18
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
19
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
20
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री

भाड्याने घर देण्यास मनाई, घरमालकावर काठीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:13 IST

अमरावती : भाड्याने घर देण्यास मनाई केल्याच्या कारणावरून एका घरमालकावर काठीने हल्ला चढवून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. इतकेच ...

अमरावती : भाड्याने घर देण्यास मनाई केल्याच्या कारणावरून एका घरमालकावर काठीने हल्ला चढवून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. इतकेच नव्हे तर किराणा दुकानाची तोडफोड करून गल्ल्यातील सहा हजार रुपये हिसकावून खंडणीसुध्दा मागण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री गाडगेनगर हद्दीतील अलहिलाल कॉलनीत घडली.

याप्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी आरोपी रहीम बिल्डर उर्फ रहीम खान कादर खान (३७, सहारा कालोनी) आणि जुबेर खान अफजल खान (२०, रा. सहारा कॉलनी) यांच्याविरुध्द गुन्हा नोंदवून, त्यांना अटक केली आहे. यासंदर्भात फिर्यादी फिरोज खान रहीम खान (४५, रा. पॅराडाइज कॉलनी) यांच्या तक्रारीवरून सदर गुन्हा नोंदविण्यात आला.

अलहिलाल कॉलनीत फिरोज खानव्दारा संचालित खान ट्रेडींग कंपनी आहे. हे दुकान त्यांचा भाचा सोहेल खान कैसर खान सांभाळत आहे. १५ दिवसांपूर्वी शारीक नामक एका व्यक्तीला फिरोज खान यांचे मोठे भाऊ कैसर खान यांनी वाहेद कॉलनीतील घर भाड्याने दिले होते. बुधवारी शारीक यांच्या खोलीवर रहीम बिल्डर सामान आणत असल्याचे फिरोज खानला दिसले. त्यामुळे त्यांनी रहिम बिल्डरला हटकले. त्यामुळे रहीम बिल्डरसह त्याचा साथीदार जुबेर खानने काठीने फिरोज खानवर प्राणघातक हल्ला चढविला. तसेच खान ट्रेडींग या दुकानात शिरून काठ्यांनी तोडफोड केली. दुकानातील गल्ल्यातील ६ हजारांची रोख जबरीने काढून घेतली आणि कांचेच्या बॉटलची तोडफोड केली. तसेच व्यवसाय करायचा असेल, तर हप्ता द्यावा लागेल, अन्यथा तुझ्या भावाला आणि भाच्याला जिवाने मारून टाकेन, अशी धमकीही बिल्डर रहिमने दिली. या घटनेच्या माहितीवरून गाडगेनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले करीत आहेत.