शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्राध्यापक भरतीसाठी ‘इन कॅमेरा’चा नकार; विधानपरिषदेत घोषणेनंतरही संस्थाचालक जुमानेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 16:38 IST

विद्यापीठ अनुदान आयोगाने राज्यात प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यासाठी मान्यता प्रदान केली आहे.  

अमरावती : राज्य विधिमंडळाच्या गत अधिवेशनात प्राध्यापक भरती ही इन कॅमेरा होईल, अशी घोषणा करण्यात आली. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानपरिषेदत जाहीर केले. मात्र, राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापक भरती व्हिडीओ चित्रिकरण, सीसीटिव्ही कॅमेरे डावलून सुरूच आहे. त्यामुळे या भरतीत आर्थिक व्यवहार होत असल्याची शंका बळावली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने राज्यात प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यासाठी मान्यता प्रदान केली आहे. अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ४,७३८ प्राध्यापकांच्या भरतीला मंजुरी मिळाली. त्याअनुषंगाने अमरावती विभागात ६३४ प्राध्यापकांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम व यवतमाळ अशा पाच जिल्ह्यांत एकूण ७९ महाविद्यालयांत प्राध्यापक भरती होणार आहे. अमरावती, अकोला येथे भरतीला मान्यता मिळाली आहे. अंजनगाव सूर्जी येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक भरतीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. परंतु, प्राध्यापक भरतीच्या 'रेट'बाबत विधानपरिषदेत आमदार सतीश चव्हाण यांनी २२ जून रोजी मुद्दा उपस्थित केला होता. खुल्या गटातील जागांसाठी मोठी रक्कम घेत असल्याची बाब आमदार मनीषा कायंदे यांनी विधिमंडळाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे विधानपरिषदेने प्राध्यापक भरती पारदर्शकपणे व्हावी, यासाठी व्हिडीओ चित्रिकरण, सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात यावे, अशी घोषणा करण्यात आली. असे असताना विधिमंडळात झालेल्या घोषणेलादेखील दस्तुरखुद्द उच्च शिक्षण विभागासह संस्थाचालक जुमानत नसल्याचे वास्तव आहे.

अ‍ॅकेडमिक ग्रेडशन प्रणाली गुंडाळलीरयत शिक्षण संस्थेने तयार केलेली अ‍ॅकेडमिक ग्रेडशन प्रणालीसुद्धा प्राध्यापक भरतीदरम्यान लागू करण्यात येत नाही. मर्जीतील आणि जवळील प्राध्यापकांची निवड केली जात आहे. उमेदवारांचे शैक्षणिक कागदपत्रांनुसार ग्रेडशन व्हावे, असे शासनाला अपेक्षित आहे. मात्र, प्राध्यापक भरती मिलिभगत असल्याचे चित्र आहे. पदवी, पदव्युत्तर, एमफिल, पीएच.डी. नेट व जीआरएफ, रिसर्च पेपर, बक्षीस, अवार्ड आणि मुलाखतीअंती पात्र उमेदवारांची प्राध्यापकपदी नियुक्ती होणे अपेक्षित आहे.