शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

 अधिकारी- लोकप्रतिनिधी यांच्यातील दरी कमी व्हावी; विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 18:46 IST

पत्रांना उत्तर न देणे, कार्यक्रम पत्रिकेत राजशिष्टाचार न पाळणे, जनतेच्या समस्या आणि प्रश्नांना बगल देणे आदी बाबींमुळे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात तणाव, दरी वाढत आहे. त्यामुळे ही दरी कमी होऊन जनेतेचे प्रश्न सुटावे, यासाठी विधान परिषदेची विशेषाधिकार समिती प्रामुख्याने काम करीत असल्याची माहिती समितीच्या प्रमुख आमदार नीलम गो-हे यांनी अमरावती येथे दिली.

अमरावती : पत्रांना उत्तर न देणे, कार्यक्रम पत्रिकेत राजशिष्टाचार न पाळणे, जनतेच्या समस्या आणि प्रश्नांना बगल देणे आदी बाबींमुळे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात तणाव, दरी वाढत आहे. त्यामुळे ही दरी कमी होऊन जनेतेचे प्रश्न सुटावे, यासाठी विधान परिषदेची विशेषाधिकार समिती प्रामुख्याने काम करीत असल्याची माहिती समितीच्या प्रमुख आमदार नीलम गो-हे यांनी अमरावती येथे दिली.विधान परिषद विशेषाधिकार समितीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागप्रमुखांची बैठक घेऊन प्रश्न, समस्यांवर लक्ष वेधले. त्यानंतर समिती प्रमुख आ. गो-हे यांनी पत्रपरिषदद्वारा बैठकीत झालेल्या प्रमुख मुद्द्यांबाबतची माहिती दिली. त्यांच्या मते, आमदार-खासदारांना विशेषाधिकार आहेत. लोकप्रतिनिधींना प्राप्त विशेषाधिकार आणि राजशिष्टाचाराचे पालन अधिका-यांनी करणे अपेक्षित आहे. मात्र, बहुतांश जिल्ह्यांमध्ये अधिकारी-लोकप्रतिनिधींमध्ये संघर्षाची ठिणगी उडत असल्याने जनतेच्या विकासकामांकडे दुर्लक्ष होते. लोकप्रतिनिधींंच्या पत्राला अधिका-यांनी नियमानुसार ठरावीक कालावधीत उत्तर दिले, तर दरी येणार नाही, ही बाब बैठकीत ठणकावून सांगितल्याचे त्यांनी सांगितले. ब-याच विभागात मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या विशेषाधिकारावर गदा येणार नाही, ही काळजी विभागप्रमुखांनी घेण्याबाबत सूचना केल्या आहेत. अधिकारी-लोकप्रतिनिधींमध्ये प्रसंगी संघर्ष उद्भवल्यास अधिका-यांची साक्ष, शिस्तभंगाची कारवाई आदी भानगडी वाढतात. त्यामुळे अधिकारी- लोकप्रतिनिधींनी नियम-अधिकाराचे पालन करावे, यावर समितीचा भर असल्याचे त्या म्हणाल्या. ही समिती राज्यभर दौरे करणार आहे. विशेषत: महसूल विभागाने शेतक-यांबाबत सकारात्मक भूमिका वठवावी, याविषयी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. महापौर, जिल्हा परिषद अध्यक्षांचा प्रोटोकॉल प्रशासनाने पाळावा, असे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला समितीचे सदस्य आ. रामराव वडकुते, आ. ख्वाजा बेग, उपसचिव कानेड, अवर सचिव उमेश शिंदे यांच्यासह शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रशांत वानखडे, शहराध्यक्ष सुनील खराटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Amravatiअमरावती