शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सात गावांत ‘रेड अलर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 01:15 IST

पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू, चिकनगुणिया, स्क्रब टायफस, स्वाईन फ्लू या साथीच्या आजारांसह डायरिया, कावीळ, कॉलरासारखे आजाराची शक्यता बळावते. त्याअनुषंगाने गतवर्षी ज्या गावांमध्ये साथरोगाचा संसर्ग झाला अशा सात गावांमध्ये ‘रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजलजन्य आजार : प्रतिबंधात्मक उपाययोजना, सजगतेचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू, चिकनगुणिया, स्क्रब टायफस, स्वाईन फ्लू या साथीच्या आजारांसह डायरिया, कावीळ, कॉलरासारखे आजाराची शक्यता बळावते. त्याअनुषंगाने गतवर्षी ज्या गावांमध्ये साथरोगाचा संसर्ग झाला अशा सात गावांमध्ये ‘रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणेस सजग राहण्याचे निर्देश देण्यात आले असून आपातकाळासाठी राखीव पथक ठेवण्यात आले आहेत.गतवर्षी स्क्रब टायफस या आजाराने ग्रामीण भागात थैमान घातले होते. शहराच्या तुलनेत डेंग्यूची तीव्रता कमी असली तरी ग्रामीण भागातही डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. तसेच तिवसा तालुक्यातील धारवाडा, चिखलदरा तालुक्यातील सोनापूर, लाखेवाडी, चोबिदा, चांदूर रेल्वेमधील सुपलवाडा, वरूडमधील मोरचूद आणि मोर्शीमधील येरला या गावांमध्ये मागील वर्षी पावसाळ्याच्या दिवसांत या आठ गावांमध्ये डायरिया व अन्य साथरोगांचा प्रकोप वाढला होता.पावसामुळे वातावरणात रोगराई पसरविणाऱ्या जंतूंची उत्पत्ती होऊन त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. पावसाळ्यामुळे ठिकठिकाणी कुजणारा कचरा, अडलेल्या कचºयामुळे पावसाचे साचणारे पाणी, चिखल आणि दलदल यामुळे साथीचे विविध आजार पसरण्याचा धोकादेखील निर्माण होऊ शकतो. त्यासाठी प्रत्येकाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची खबरदारी घेणे गरजेचे आहे. याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.शेणखताच्या ढिगाऱ्यापासून पसरतो कॉलरापावसाळ्याच्या दिवसांत लोकवस्तीजवळ असलेल्या शेणखताच्या ढिगाºयात पाणी साचल्याने कॉलरासारख्या आजाराची साथ पसरते. त्यामुळे शेणखताचे ढिगारे शक्यतो गावाबाहेर काढणे आवश्यक आहे. या सोबतच नदीकाठच्या नागरिकांनी साथरोगापासून बचाव करण्यासाठी दक्षता घ्यावी. पाणी गटारे साचू नये, यासाठी परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.या साथ रोगाची भीतीकीटक, हवा, दूषित पाणी, अन्नपदार्थ यामुळे एकाच वेळी एका भागातील अनेक लोकांना जो आजार होतो, त्याला साथीचा आजार, असे म्हणतात. सर्वसाधारणपणे पावसाळ्यात स्वाइन फ्लू, चिकनगुनिया, हिवताप, डायरिया, डेंगू, काविळ, कॉलरा अशा विविध आजारांची लागण होण्याची अधिक शक्यता आहे.पावसाळ्याच्या दिवसांत साथरोगाची लागण होऊ नये यासाठी पाणी नमुने, लिकेज दुरुस्ती, क्लोरीन, ब्लिचिंग पावडर व अन्य उपाययोजना करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना दिले आहेत. साथरोगाची लागण होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने उपाययोजना केल्या आहेत.- डॉ. मनीषा सूर्यवंशी, जिल्हा साथरोग अधिकारी

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स