शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट जनावरे मालकांकडून नऊ लाख रुपये दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:10 IST

शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त लावणाऱ्या महापालिकेच्या पथकाने पशुपालकांकडून वर्षभरात ९ लाख ३१ हजार ९१५ रुपयांचा दंड वसूल केला. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सर्वाधिक दंड वसुल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे१३४२ जनावरे पकडली : गेल्या वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक वसुली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त लावणाऱ्या महापालिकेच्या पथकाने पशुपालकांकडून वर्षभरात ९ लाख ३१ हजार ९१५ रुपयांचा दंड वसूल केला. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सर्वाधिक दंड वसुल करण्यात आला आहे.पशुपालकांना जनावरांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असताना अनेक जण जनावरांना मोकाट चराईसाठी सोडून देतात. नियमांचे उल्लंघन करणाºया अशा पशुपालकांवर महापालिकेच्या पथकाकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. शहरात फिरणाºया मोकाट जनावरे वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा मोकाट जनावरांना पकडून गौरक्षणात ठेवण्यात येते. ज्यावेळी पशुपालक जनावरांना सोडविण्यासाठी येतात. त्यावेळी त्यांच्याकडून दंड वसुल करण्यात येतो. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागातील स्वास्थ्य निरीक्षक पंकज कल्याणकर यांच्या पथकाने पोलीस विभागातील एएसआय सुनील धर्माळे, बुंदेले, नारायण सोळंके व गजभिये यांच्या मदतीने मोकाट जनावरांची धरपकड मोहीम राबविली. सन २०१५-१६ या कालावधीत २ लाख २२ हजार ५५६ दंड वसूल करण्यात आला. २०१६ -१७ मध्ये १,४९० मोकाट जनावरांना पकडून ५ लाख २६ हजार ९४४ रुपये व २०१७-१८ मध्ये १,३४२ जनावरे पकडून ९ लाख ३१ हजार ९१५ रुपयांचा दंड वसूल केला आहे.१४ जणांविरुद्ध एफआयआरमोकाट जनावरांना पकडताना अनेक पशुपालक महापालिका अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा निर्माण करतात. अशावेळी पशुपालकांविरुद्ध पोलीस तक्रार केली जाते. वर्षभरात अशाच कारवाईदरम्यान तब्बल १४ पशुपालकांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार नोंदविण्यात आली आहे.मोकाट जनावरांना पकडून पशुपालकांकडून दंड वसुली केली जाते. त्यादरम्यान पशुपालक वाद घालतात.त्यावर मात करत नऊ लाखांची दंडवसुली करण्यात आली.पंकज कल्याणकर, स्वास्थ्य निरीक्षक, महापालिका.