शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

बहिरम चेकपोस्टवर पठाणी वसुली

By admin | Updated: June 21, 2015 00:32 IST

खरपी येथील चेकपोस्टचे स्थानांतरण करून मध्यप्रदेश सिमेमध्ये अत्याधुनिक चेकपोस्ट व धरमकाट्याची व्यवस्था..

ओव्हरलोड ट्रकचालकांची लूट : आरटीओ अधिकाऱ्यांची ट्रान्सपोर्टसोबत सांगडचांदूरबाजार : खरपी येथील चेकपोस्टचे स्थानांतरण करून मध्यप्रदेश सिमेमध्ये अत्याधुनिक चेकपोस्ट व धरमकाट्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र येथे काट्या लागण्यापूर्वी खरपी येथील चेकपोस्ट बंद करण्यात येऊन नवीन जागेत चेकिंग सुरू करण्यात आले आहे. यामुळे पुन्हा तीच परिस्थिती उद्भवली आहे. ट्रान्सपोर्ट व उपप्रादेशिक अधिकाऱ्यांची सांगड असून या माध्यमातून ओव्हरलोड ट्रक चालकांकडून लाखोंची वसुली सुरू आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे संचालित चेकपोस्ट हे केवळ ओव्हरलोड ट्रक चालकांकडून वसुलीचे एकमेव काम करीत आहे. मध्यप्रदेश राज्य महामार्गावर ओव्हरलोड, भारी ट्रकच्या येण्यामुळे रस्त्याची स्थिती चिंताजनक होत आहे. तीन वर्षांपूर्वी परिसरातील आमदारांनी ८ ते १० ओव्हरलोड ट्रक पकडून आरटीओ यांना कारवाई करण्यासाठी प्रवृत्त केले होते. परंतु यानंतर प्रकरण ‘जैसे थे’ होऊन गेले. याबाबत दखल घेत आ. बच्चू कडू यांनी अमरावती आरटीओ कार्यालयात धाड टाकत खुर्ची फेकत आंदोलन केले होते. याचे कौतुकही करण्यात आले होते. अकोला, अमरावती, खामगाव, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा व नागपूर येथील मोठे ट्रान्सपोर्ट मालक या गोरखधंद्यामध्ये आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत जुळलेले असून ओव्हरलोड ट्रकच्या वाहतुकीसंदर्भात थेट दिल्लीपर्यंत व्यवहार करत असतात. प्रत्येक ट्रकचालकाला यासंदर्भात विशेष असे कार्ड वितरण करण्यात येत असते. ज्याला बैतुल मार्गावर कुठल्याही चेकपोस्टवर दाखविल्यानंतर त्यावर कारवाई करण्यात येत नाही. वास्तविक ते ओव्हरलोड ट्रकवर २६ हजार रूपये टन दंड आकारण्याचा नियम आहे. परंतु ५ ते १० हजार रूपये टनाच्या हिशोबाने अवैधरीत्या रक्कम अधिकाऱ्यांना चुकविण्यात येत असते.यानंतर विशिष्ट नंबरचे कार्ड संबंधित ट्रान्सपोर्ट चालकाकडे देण्यात येत असते. यावर जनप्रतिनिधींनी लगाम लावण्याची गरज निर्माण झाली आहे. असे न झाल्यास कोट्यवधी रुपयांचा रस्त्यावर खर्च केलेला निधी वाया जावून डांबरीकरण केलेल्या चारपदरी रस्त्याचे तीनतेरा वाजल्याशिवाय राहणार नाही. मध्यप्रदेशाहून येणाऱ्या मार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभाग, आरटीओ, वनविभाग, कस्टम अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांना राहण्यासाठी अत्याधुनिक सुविधेसह इमारत सज्ज असून ती सद्यस्थितीत धूळखात असल्याचे चित्र आहे. (तालुका प्रतिनिधी)प्रत्येक वाहनामागे अवैध वसुली मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी असलेल्या अत्याधुनिक चेकपोस्टची निर्मिती करण्यात आली असून याचे स्थानांतरण ११ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. परंतु सदर चेकपोस्टवर धरमकाटा बंद असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गत काळात खरपी या गावाच्या पुढे चेकपोस्ट होते. सदर चेकपोस्टवर दर दोन दिवसानंतर आरटीओ अधिकारी बदलण्यात येत होते. केवळ तीन कर्मचाऱ्यांवर सदर चेकपोस्ट चालत होता. जेथे कुठल्याही प्रकारचा काटा नव्हता. यामुळे ओव्हरलोड ट्रक चालक हे आरटीओ अधिकाऱ्यांना बनावट पावत्या दाखवून वेळ मारून नेत होते.