शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे रेकॉर्ड सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 01:13 IST

नगर परिषदेच्या बांधकाम विभागातील चार आर्थिक वर्षातील संपूर्ण दस्तावेज (फायली) जप्त करण्यात आला आहे. जप्तीच्या कारवाईनंतर कपाटे सीलबंद करण्यात आली. उपविभागीय अधिकारी अभिजित नाईक यांच्या नेतृत्वात गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : एसडीओंच्या नेतृत्वात चांदूर रेल्वेत कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : नगर परिषदेच्या बांधकाम विभागातील चार आर्थिक वर्षातील संपूर्ण दस्तावेज (फायली) जप्त करण्यात आला आहे. जप्तीच्या कारवाईनंतर कपाटे सीलबंद करण्यात आली. उपविभागीय अधिकारी अभिजित नाईक यांच्या नेतृत्वात गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईने नगर परिषद प्रशासनासह राजकारण्यांमध्येही हलकल्लोळ माजला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये झालेली हे जप्तीप्रकरण नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे.बांधकाम विभागातील सन २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ व २०१७ -१८ या चार आर्थिक वर्षातील सर्व फायली जप्त करून कपाटात सील करण्याच्या कारवाईस नगर परिषद प्रशासनाने दुजोरा दिला असला तरी मुख्याधिकारी ‘नॉट रिचेबल’ असल्याने प्रशासनाची बाजू समजू शकली नाही. रेकॉर्ड जप्त करत असताना नगर परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसल्याचे चित्र यावेळी अनुभवयास मिळाले.जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आदेश आल्याने सन २०१४ ते आतापर्यंतचे नगर परिषदेच्या फक्त बांधकाम विभागाचे रेकॉर्ड जप्त करण्यात आले. ते कपाटामध्ये बंद आहेत. यानंतर या फायलीचे नगर परिषदेच्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांसमोर विशेष अंकेक्षण (लेखापरीक्षण) करण्यात येईल. आपल्याला केवळ रेकॉर्ड सील करण्याचा आदेश होते. त्यानुसारच कारवाई केल्याचे उपविभागीय अधिकारी अभिजीत नाईक म्हणाले. नगरपालिका प्रशासनात बांधकाम विभागाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अन्य सर्व विभागाच्या तुलनेत या विभागाचे आर्थिक बजेट अधिक असते. बांधकाम विभागाकडून होणाऱ्या अनेक कामांवर अनेकवेळी अनियमिततेचे आरोप केले जातात. या विभागातील कमिशनखोरीही सर्वज्ञात आहे. त्याअनुषंगाने जप्त फायलीमधून काय निघणार, याकडे राजकीय धुरिणांसह प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष लागले आहे.दरम्यान, चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या दस्तावेज जप्ती आदेश असल्याने आम्हाला कारवाई करायची आहे, एवढेच कारवाई पथकाने सांगितल्याचे नगराध्यक्ष शिट्टू सूर्यवंशी यांनी सांगितले.घरकुलासंबंधी चर्चेला उधाणचांदूर रेल्वे नगर परिषदेत अलीकडेच घरकुल घोटाळा प्रकाशात आला. त्याबाबत ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्याअनुषंगाने ही कारवाई नसावी ना, अशी शक्यता व्यक्त होत आहे. यासंदर्भात बांधकाम सभापती कल्पना लांजेवार व मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.मुख्याधिकारी-नगरसेवकांत विळ्या-भोपळ्याचे सख्यनगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांची वरूड नगर परिषदेत बदली झाली. त्यानंतर अकोला जिल्ह्यातील पातूर नगर परिषदेत कार्यरत मिलींद दारोकार यांची चांदूर रेल्वेला बदली झाली. रुजू झाल्यापासून नगराध्यक्षांसह सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्षांच्या नगरसेवकांशी त्यांचे जमले नाही. अनेकदा नगरसेवक व त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. नगर परिषदेमध्ये रुजू झाल्यापासून कार्यालयीन कामकाजात कमी दिवस हजर राहून, ते कार्यालयीन कामकाजात अत्यल्प सहभागी होत असल्याचा आरोप नगरसेवक करीत होते. गुरुवारच्या कारवाईस ही वादाची किनार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका